Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य इस्लामचे शांति-कार्य इस्लाम म्हणजेच लष्करशाही असे म्हणणे हा इतिहासाचा केवळ विपर्यास आहे. महंमद हा अरब व्यापारांचा गुरु होय ! - प्रवाशी अरव स्वारांचा नव्हे. त्याने आपल्या धर्माला जे नांव दिलें तेच मुळीं लष्करशाहीच्या कल्पनेच्या विरोधी आहे. व्युत्पत्तिशास्त्रदृष्ट्या इस्लाम म्हणजे शांतता-तह करणे. मूर्तीचे बंड मोडून अद्वैताच्या पुरस्काराने देवाशी एकरूप होणे म्हणजे इस्लाम‘धर्मी बनणे होय. मूर्तीतील दैवी गुणांचा इन्कार आपण केला नाहीं तर आपली सर्व निष्ठा वांयाच जाते. अरब. टोळयांचे ऐक्य करून जगांत शांतता प्रस्थापन करणे हे इस्लामचे ऐहिक शांतिकार्य होय. ऐहिक शांति ही निकडीची व अधिक महत्त्वाची होती. अरब व्यापा-यांचे हितरक्षणासाठी तिची आवश्यकता होती. व्यापाराची अभिवृद्धि शांततेच्या काळांतच अधिक होते. खिळखिळीं राज्ये व सडलेले धर्म यांतूनच युद्धे निर्माण होतात. त्यांच्या नाशाशिवाय शांति प्रस्थापित होत नाही. महंमदी धर्माने अरबस्थानांत शांतता निर्माण केली व तिचा लाभ समरकंद ते स्पेन यांच्या दरम्यानच्या विस्तृत प्रदेशांतील लोकांना करून दिला. व्यापाराकडे ओढा उद्योग आणि शेती यांच्या सुधारणेमुळे, देशांतील आर्थिक जीवनांत चैतन्य निर्माण झालें. अरब व्यापा-यांच्या हितसंबंधानुरोधामें इस्लामी राज्याच्या धोरणाचे सुकाणू फिरू लागले. रोम व इतर प्राचीन संस्कृतिसंपन्न राष्ट्रे उत्पादक श्रमाकडे तुच्छतेने पाहूं। लागली होती. * न ऋते श्रान्तस्य सख्याय देवाः' हा वैदिक आदेश हदस्थानांतील लोकही विसरून गेले होते. युद्ध आणि यज्ञ हे दोनच त्यांचे उदात्त धंदे होऊन बसले होते ! अरबांची गोष्ट मात्र भिन्न होती. अरबांना वाळवंटांतल्या फिरत्या जीवनाने श्रम म्हणजेच ४६