पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य त्या पुष्पसमर्पणाने अल्ला व पैगंबर हे संतुष्ट व्हावेत अशी माझी इच्छा आहे.' इजिप्तचा महापराक्रमी जेता ओम्राव हा केवळ युद्धचतुरच नव्हता, तर तो कविही होता. खलिफा उमर यास पाठविलेल्या त्याच्या एका प्रतिवृत्तांतील खालील उतारा वाचनीय आहे : अर्थशास्त्रीय तत्वज्ञान शेती करणारे शेतकरी म्हणजे जणू काय मुंग्याच होत. त्यांच्या ठायी असलेला आळशीपणा एकाद्या धन्याच्या कोरड्याने पळून जातो; परंतु त्याने उत्पादन केलेलें धन श्रमजीवी आणि धनी यांचेमध्ये विषमतेने वाटले जाते. अर्थात् हा विचार फारच दूरवरचा होता. पूर्वीच्या संस्कृतींत सामाजिक समतेची कल्पनाच मुळीं अज्ञात होती. मग ते गुलाम असोत वा शूद्र असोत, श्रमजीवी म्हटला की त्याच्या वांट्याला तिरस्कार आणि पिळवणूक हीं असावयाचीच; तो मनुष्यप्राणी म्हणूनही ओळखला जात नसे. अरब व्यापा-यांचे हितांत ज्याचे बीज आढळून येते असे खलिफाचे अर्थशास्त्रीय तत्त्व फारच महत्त्वाचे आहे. त्या योगाने पूर्वीच्या सामाजिक कल्पनांत क्रांति घडवून आणली. श्रमजीवी जनतेने उत्पादन केलेल्या धनाचा कांहीं अंश त्या जनतेला दिला तर व्यापाराचे अभिवृद्धीस जोराची मदत होते. उमरच्या सूक्ष्म दृष्टीला दिसून आलेली दुःखकारक विषमता कमी करण्याचा प्रयत्न त्याने फराव व टालेमी यांच्याकडून जिंकलेल्या प्रांतांची राज्यव्यवस्था करतांना केला. ग्रीक आणि रोमन लोकांनीं पिळून चिपाड बनविलेला इजिप्त अरब राजवटीखालीं हळू हळू भरभराटून -पुष्ट बनू लागला. | ऐन लष्करी स्वा-यांच्या भरभराटींतही अरब सरदार निवळ विध्वंसक मारेकरी नव्हते हे सिद्ध करण्यास पुरेसे पुरावे सहज देता येतील. शिवाय मोहिमेचा काळ फारच अल्प. उलट शिक्षण आणि ४४