Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामचे कार्य भूतीस कां बरें पात्र होणार नाहीत ? जितांना सहानुभूतीने वागविल्याशिवाय त्यांच्यावर अबाधित सत्ता प्रस्थापित करणे हे जेत्यांना अशक्य आहे. उमर या दुस-या खलिफाच्या वेळी एका बाजूस ऑक्सस नदीपर्यत व दुस-या बाजूस अलेक्झेंड्रियापर्यंत साम्राज्याचा विस्तार झाला होता. अशा वेळीही या खलिफानें जेरुसलेममध्ये सर्व दरबारी जमाना एका उंटावर घालून प्रवेश केला. त्या उंटावर एक तंबू, धान्याची पिशवी, खजुराची एक पडशी, लाकडी कटवा आणि पाण्याची एक पखाल एवढेच काय ते राजवैभव होते. इराण, इजिप्त वगैरे प्रांत ज्यांनी जिंकले ते किती साधे, निष्ठावंत, न्यायप्रिय व सदाचारी होते याचे वर्णन गिबनने सुंदर केले आहे : " त्यांचा मुक्काम जेथे जेथे पडे तेथे तेथे सर्वांना 'पवित्र' प्रसादासाठी बोलावण्यांत येत असे. स्वारीवर असतांनादेखील तो आपले अधिकार न्यायदानासाठीच उपयोगांत आणीत असे. अरबांत असलेली बहुपत्नित्वाची व व्यभिचाराची चाल त्याने सुधारली. तो मांडलिकांची पिळवणूक थांबवीत असे, त्याचप्रमाणे अरबांच्या ऐषारामाबद्दल त्यांना तो शासन करीत असे." --रोमन साम्राज्याचा न्हास व नाश.. देवाची तरवार खलिद हा अतिशय पराक्रमी होता. त्याला महंमदानें “देवाची तरवार' अशी पदवी दिली होती. त्याने मुसलमानी निशाणाखाली अरेबिया, सीरिया आणि मेसेपोटेमिया यांना एकत्र आणले. परंतु अशा महान् विभूतीच्या मृत्युसमयीं त्याच्याजवळ त्याचा घोडा, त्याची हत्यारे व त्याचा एक गुलाम एवढीच काय ती संपत्ति होती. या महान पुरुषाने तारुण्यांत एकदां असे उद्गार काढले होते की, * सीरियांतील सुंदर वस्तूंच्या अभिलाषानें अगर ऐहिक नश्वर सुखोपभोगांच्या लालसेने मी आपले जीवन धर्मप्रसारार्थ वाहत नसून ४३