इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य नव्हे. त्यांच्या योगानें आपलें चित्त वेधते आणि असल्या प्रचंड गतिमान् ऐतिहासिक आश्चर्याचे कारण शोधण्याचे औत्सुक्य वाढते. 'देवसेने' च्या या चमत्कारपूर्ण कृत्यांनीच सामान्य अभ्यासकाचे डोळे दिपून जातात आणि त्यामुळे त्याला या महत्त्वाची क्रांतिकारक कार्ये दिसतच नाहींत—मग तो महंमदाचा अनुयायी असो वा नसो. हे लष्करी विजय पुढील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील कार्याचा प्रारंभच होत. त्यांच्यामुळे आर्थिक उन्नति व आध्यात्मिक प्रगति घडवून आणणारे राजकीय वातावरण निर्मले गेले. रोमन व इराणी साम्राज्याचे अवशेष नाहीसे करणे अवश्य होते. तरच नवीन कल्पना व ध्येये यांनीं निबद्ध अशी नवी साम्राज्यघटना तयार होणे शक्य होते. दुष्ट रूढींनीं आणि जादूटोण्याच्या गूढवादाने सर्व वातावरण गढळून टाकले होते आणि त्यामुळे पशियन व बायझंटाइन साम्राज्यांतील प्रजेचा आध्यात्मिक, बौद्धिक व नैतिक विकास अगदी खेटूनच गेला होता. महंमदाच्या एकेश्वरी वादाच्या तरवारीने अरबी टोळ्यांमधील दांभिक मूर्तिपूजेचा नायनाट केला, झोरॉअस्टरच्या चिरंतन अशा दुष्ट तत्त्वज्ञानापासून मानवाला मुक्त केलें, ख्रिश्चन धर्माच्या चमत्कारपूर्ण रूढींच्या चिखलांतन त्यांचा उद्धार केला, आणि हिंदुस्थानाला संन्यासवादाचा लागलेला रोग पूर्णपणे बरा करण्याचे कामीं वरील हत्यार अत्यंत उपयक्त ठरले. अरबांच्या सर्व विजयांच्या योगाने नवा इतिहासच घडविला गेला आहे; मानवी समाजाला प्रगत केले आहे. प्राचीन ग्रीक संस्कृतीचा आध्यात्मिक वारसा रोमन साम्राज्याच्या नाशाखालीं व ख्रिश्चन रूढीच्या अंधारांत गडप झाला होता. त्या अमोल संपत्तीचा पुनर्लाभ घडविण्याचे श्रेय अरब सैनिकांना आणि एकेश्वर वादावर अधिष्ठित झालेल्या सामाजिक व राजकीय अभिनव राज्यघटनेसच आहे. या संपत्तीचा लाभ झाला म्हणूनच तर सर्व यूरोप खंडांतील जनता उद्विग्नतेच्या ग्रहणांतून मुक्त ४०
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/38
Appearance