Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरे इस्लामचे कार्य इस्लामच्या इतिहासाचे सामान्य अभ्यासक इस्लामच्या लष्करी लीलांवरच भर देतात, आणि त्यामुळे इस्लामच्या क्रांतिकारक कार्याच्या महत्त्वाकडे काणाडोळाच करतात. युद्धांतील विजय एवढे एकमेव कार्यच इस्लामचे असते तर त्याला ऐतिहासिक महत्त्व कांहींच नाहीं. तार्तरी आणि सिथिया यांच्या रानटी टोळ्यांचे हल्ले हे अरबांच्या लष्करी हालचालीपेक्षां नसले तरी निदान तितकेच भयंकर होते हैं। खास; परंतु यूरोप आणि आशिया यांच्या सीमाप्रांतापासून पूर्व, दक्षिण आणि पश्चिम यांवर ज्या हल्ल्यांच्या लाटा आदळत, त्या आणि अरबांच्या धर्मवेडांचे मधून मधून होणारे हल्ले यांमध्ये महदंतर आहे. पहिल्या हल्ल्यामध्ये राजकीय अगर सामाजिक उलथापालथ थोडा वेळ होत असे. विनाश आणि कत्तल एवढीच काय ती आपले अवशेष ठेवून त्या लाटा विरूनही जावयाच्या. परंतु अरबांच्या हल्ल्यांच्या लाटांना स्थिर स्वरूप असून मानवी इतिहासांतील संस्कृतीचा रम्य प्रांत त्यांनी निर्माण केला आहे. विनाश हे त्यांचे गौण कार्य होय. जुन्याचा अवश्यंभावी नाश त्याने केलाच, पण तोही नवीनाची घटना व्हावी म्हणून. सीझर आणि चासो यांचे माजलेले देव्हारे त्यांनी मोडून टाकले, मानवी ज्ञानाचा होणारा विनाश त्यांनी थांबविला आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी त्यांनी त्याचे संरक्षण केले. सांस्कृतिक साध्य अरब घोडेस्वारांची अजब कृत्ये हेच कांहीं इस्लामचे वैशिष्ट्य ३९