Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाई मानवेंद्रनाथ रॉय ( अल्प चरित्र) - ज्यांच्या जीवनाचे सार 'क्रांति' या शब्दाने वणता येईल असे हिंदुस्थानचे पुढारी थोडेच असतील. त्या थोड्यांपैकीं शास्त्रशुद्ध क्रांतीच्या मार्गाचा अवलंब करणारे त्याहून थोडे आणि त्यांपैकी आपल्या मार्गावर अढळ विश्वास ठेवून कायम राहिलेले लोक तर ' भवति वा न वा' या सुभाषितांत म्हटल्याप्रमाणे अत्यल्प च सांपडतील. अशा अत्यल्प व्यक्तींपैकीं भाई मानवेंद्रनाथ रॉय हे एक आहेत. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षीच त्यांनीं क्रांतीचे * सतीचे वाण' बुद्धयाच घेतले. आपल्या जीवनाच्या भाई मानवेंद्रनाथ रॉय ४५ वर्षांपैकी ३० वर्षे त्यांनी हद्दपारी, तुरुंग, हालअपेष्टा, उपासमार यांच्या ज्वालांना न जुमानतां आपले व्रत अखंड चालू ठेवले आहे. एकदां तर मृत्यूच्या द्वारांत ते शिरले होते. परंतु, पुढील कार्यासाठी त्यांनी त्याला हात दाखवून थांबवून धरले. त्यानंतर मेक्सिको, स्पेन, फ्रान्स, रशिया, चीन इत्यादि २३