Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना

श्री. रॉय यांच्याजवळ जितके जावे, तितके त्यांचे निर्मळ जीवन अधिक प्रत्ययास येते. सर्वांगीण विद्वत्ता, निगर्वी मन, मुत्सद्दीपणा, कर्मयोग, प्रतिभासंपन्न बुद्धि, व्यवहारज्ञता, धीरोदात्तता या गुणांची रॉय हे मूत आहेत. हिंदु संस्कृतींतील आचारधर्म रॉय पाळीत नसल्यामुळे कांहीं जणांस गोंधळल्यासारखे होते. पण त्यांचे पूर्वायुष्य युरोपियन संस्कृतीत गेलें आहे, ही गोष्ट लक्ष्यांत घेतली म्हणजे मन संशयांत फार वेळ राहणार नाहीं. अत्यंत कष्टांत व संकटांत ते आयुष्य घालवीत आहेत, पण क्षुब्ध महासागरांतील देवमाशाप्रमाणे ते बेकदर व शांत दिसतात.

  • हिंदुस्थान स्टंडर्ड' चे संपादक श्री. सुरेशचंद्र मुजुमदार मला मुंबईस भेटले असतां म्हणाले कीं (* तुम्ही रॉय यांच्या बद्दल इतका आदर बाळगतां याचे मला आश्चर्य वाटते. कारण तुम्ही भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व रॉय हे भौतिकवादी पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे पंडित, दोघांची दोन टोंके आहेत. मी त्यांस म्हटले की हिंदी तत्त्वज्ञान म्हणजे नुसता शंकराचार्याचा वेदांत नाहीं. कपिल, कणाद, बुद्ध व महावीर यांचा अनीश्वरवाद आणि चार्वाकाचा भौतिकवाद हिंदी तत्त्वज्ञानांत आहे. रॉय यांचेकडे पाहिले म्हणजे मला असे दिसतें कीं हिंदुस्थानांतील कपिल-कणादांचा रॉय हा वारस व उत्तराधिकारी आहे. | भाई रॉय यांची सगळी ग्रंथसंपत्ति क्रमाने प्रकाशित होण्याचा योग आल्यास भारतीय विचारसंपत्तींत बहुमोल भर पडेल. हा अल्पारंभ आहे.

सदाशिव पेठ, ? पुणे. ११।७।३८ ) लक्ष्मणशास्त्री जोशी