Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य

जगांतील अनेक राष्ट्रांतील क्रांतीमध्यें प्रत्यक्ष भाग घेतल्यामुळें परिपक्व झालेली बुद्धि हें होय. कलिकालास न डगमगतां स्वदेशास व मानवजातीस स्वतंत्र करण्याचे प्रयत्न लहानपणापासून रॉय यांनीं केले. हिंदुस्थान, चीन, रशिया, जर्मनी, स्पेन व मेक्सिको येथील क्रांतींत सामील होऊन जो अनुभव मिळाला त्यामुळे रॉय यांचीं प्रज्ञा परिणत झाली आहे. आंतरराष्ट्रीय अनेक क्रांतिकारक घडामोडींत रॉय यांस पहिल्या प्रतीचें स्थान प्राप्त झालें होतें. रौलेट कमिटीच्या १९१८ सालीं प्रसिद्ध झालेल्या राजद्रोह वृत्तांतील ‘जर्मन कारस्थान' हें प्रकरण पहा. त्यांत अगदीं लहान वयांत रॉय यांच्यावर मोठ्या जबाबदारीचें कार्य हिंदी क्रांतिकारकांनी सोंपविलेलें दिसून येतें. विशाल बुद्धीच्या लेनिनने व मुत्सद्दी स्टॅलिननें रॉय यांना पौर्वात्य देशांतील राजकीय क्रांतींत व थर्ड इंटरनॅशनलमध्ये जबाबदारीचें स्थान दिलेलें दिसतें. मतभेद झाल्यावर ते स्थान त्यांना सोडावें लागलें.
  ज्या वेळीं चीनच्या फिस्कटलेल्या राजकारणात जबाबदार कोण यासंबंधी स्टेलिन व इतर चार रशियन मुत्सद्यांची बैठक चौकशीकरिता बसली, तेव्हां स्टॅलिननें रॉय यांच्यावरील एकही आरोप खरा मानला नाही, उलट चीनमध्यें बोरोडिन व इतर मंडळी रॉय यांचा सल्ला ऐकत नाहीतं, ही गोष्ट जेव्हां स्टॅलिन यास कळली तेव्हां स्टॅलिनने ‘रॉय यांचे हातीं सर्व सूत्रे सोपविलीं आहेत' अशी तार केली. परंतु ही तार योग्य वेळीं न मिळाल्यामुळे चीनमधील महत्त्वाचें डाव फसले. रॉय यांचेवर या बैठकीत कोणताही दोषारोप करण्यांत आला नाही. परंतु ज्या अनेक रशियन व्यक्तींशीं वांधा उत्पन्न झाला होता त्यांचें रॉयविरोधी कारस्थान फळास आलें व रॉय यांस थर्ड इंटरनॅशनलमधून बाहेर पडणे भाग पडलें. तथापि यांत ही गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे कीं थर्ड इंटरनॅशनलनें रॉय यांस काढून टाकण्याचा प्रत्यक्ष ठराव केव्हाही केला नाहीं. रशियन सोव्हिएट,

१६