थर्ड इंटरनॅशनल व स्टॅलीन या तिघांच्याबद्दल रॉय यांच्या तोंडून केव्हांही तिरस्कारात्मक उद्गार ऐकावयास मिळत नाहीतं, याचेही एक कारण हें असणें संभवनीय आहे.
भाई रॉय यांच्या लिखाणावरून रॉय हे थोर क्रांतिकारक व तत्त्ववेत्ते आहेत अशी माझी खात्री १९३० सालींच झाली होती. १९३१ सालीं भाई रॉय हे डॉ. महमूद या नांवानें वावरत होते. माझ्याबरोबर १९३० सालीं तुरुंगांत असलेल्या माझ्या एका स्नेह्यानें मला असें सांगितलें होतें कीं, 'तुम्ही भारतीय तत्त्वज्ञानाचा ऐतिहासिक विकासक्रम लावूं इच्छिता . ह्या कार्यात मुंबईचे डॉ. महमूद हे अधिक साहाय्य करू शकतील. मी म्हटलें, “ कै. लो. टिळक, प्रो. राधाकृष्णन्, प्रो. डायसेन, मॅक्स मुलर, कीथ, दास गुप्त इत्यादि विद्वानांच्या ग्रंथांचें मी वाचन करीत आहे. त्यासंबंधीं वरील विद्वानांच्या पेक्षा हे मुसलमान गृहस्थ अधिक कांहीं सांगूं शकतील असें मला वाटत नाहीं.' म्हणून मी १९३१ साली रॉय यांना भेटण्याची संधि गमावली. त्यांना भेटण्याचा योग १९३७ साली पुणें येथें आला. षडदर्शनांचा व शंकराचार्य वगैरे मध्ययुगीन तत्त्ववेत्त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास रॉय यांनीं केला असावा अशी मला अगोदर कल्पना नव्हती. माझी अशी समजूत होती कीं, रॉय यांनी युरोपियन व हिंदी लेखकांनी इंग्रजी, जर्मन व फ्रेंच भाषेत लिहिलेलीं समालोचनें व सारांश वाचलें असतील व त्यावरून मत बनविलें असेल. मी संस्कृत पांडित्याच्या मोठ्या अभिमानाने पहिल्यांदा रॉय यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. उपनिषदे, सांख्य, कणादचार्वाक, बौद्ध व जैन यांच्या विचारांत, कालक्रम व संगति सांगतां येईल काय ? असा प्रश्न मी रॉय यांस टाकला. मला त्यांनीं दहा मिनिटांत या प्रश्नांचा एक प्रकारचा उलगडा करता येईल, अशी १७