पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य

 क्रांतीचा पाठिंबा मिळावयास पाहिजे. हिंदुस्थानांत विचारक्रांति घडवून आणण्याकरितां भारतीयांच्या प्राचीन विचारांची मीमांसा करणें अगत्याचें आहे. श्री. रॉय यांनीं भारतीय तत्त्वज्ञानाच्या सर्व शाखांचा व भारतीयांच्या अखिल इतिहासाचा दीर्घ व्यासंग केला आहे. या व्यासंगास पाश्चात्यांच्या विज्ञान, तत्त्वज्ञान व इतिहास या विद्यांच्या खोल अभ्यासाची जोड दिली आहे. भारतीयांच्या विचारसंक्रमणाची व सामाजिक संक्रमणाची शास्त्रशुद्ध उपपत्ति रॉय यांनीं लाविली आहे.
 हिंदी राष्ट्रीय क्रांतीस आवश्यक असलेलें विचारक्रांतीचें तत्त्वज्ञान रॉय हे आतां क्रमशः मांडीत आहेत. रॉय यांनीं गेल्या सहा वर्षांच्या कारागृहवासाच्या अवधींत विशाल ग्रंथसंपत्ति निर्माण केली आहे. त्याचे पुनःसंकलन व संस्कार करून रॉय हे प्रसिद्ध करू लागले आहेत. Historical Role of Islam, Facism: Its Philosophy and Practice, Indian Renaissance ही पुस्तकें नुकतीच प्रसिद्ध झालीं आहेत. हिंदी नवजीवनाच्या तत्त्वज्ञानाचें स्वरूप रॉय यांच्या 'जेधे मॅन्शन (पुणे)' मध्ये दिलेल्या व्याख्यानांत तसेच, ' Searching Analysis of The Ideology of Orthodox Nationa-. lism', 'Science and Superstition', Religion and Superstition','Philosophical Revolution', The Cult of Asceticism and Renunciation', ' A Social Disease, ‘Culture and Civilization : ' A Comparison and Contrast' and ' Spiritualism versus Materialism ' (Madras. Youth Conference Address). इत्यादि लेखांत सांपडते.
 भाई रॉय यांची तत्त्वनिष्ठा फार उच्च प्रतीची आहे. तत्त्वाकरितां सगळया विपत्ति भोगण्यास ते तयार असतात. थर्ड इंटरनॅशनलशीं १९२८ सालीं रॉय यांचा महत्त्वाचा मतभेद झाला. त्या वेळीं त्यांच्या पाशीं अंगावरच्या कपड्याशिवाय कांहीं नव्हतें. चीनमधील दगदगीमुळें

१४