परंतु मुहंमद कांहींहि सांगोत, कुरेशांचे शेपूट वांकडेच असे. मुहंमदांचं सारें सांगणें पालथ्या घड्यावरचं पाणी होई. ते परमेश्वराच्या खुणा पहात ना, ईश्वरी संदेश ऐकत ना. डोळे असून आंधळे व कान असून बहिरे ते झाले. पूर्वीच्या दुष्ट रूढी, वाईट रीतिरिवाज सोडायला ते तयार होत ना. ते मुहमदांचे कट्टे शत्रु बनले. ते म्हणाले, "एक तूं तरी मरशील, मातीत मिळशील. नाहीं तर आम्ही तरी मरूं, जमीनदोस्त होऊ. परंतु तुझा पिच्छा पुरविल्याशिवाय आम्ही राहणार नाहीं. तुझा अधार्मिक प्रचार बंद करायला लावल्याशिवाय आम्ही राहणार नाहीं. ध्यानांत धर."
असे दिवस जात होते. मक्केतील जीवन फार अशांत व भयाण झालें होतें. त्यांच्या अनुयायांचे जे छळ होत होते ते नाहीं कमी करतां येणार? नाहीं का हे विरोध मिटवतां येणार? एकेश्वरी धर्माचा परंपरागत धर्माशी समन्वय नाहीं का करतां येणार? मक्केतील ही भांडणें कमी होऊन गुण्यागोविंदानें नाहीं का राहतां येणार? असे का विचार पैगंबरांच्या मनांत या वेळेस खेळत होते? एके दिवशीं काबाजवळ तन्मय होऊन कुराणांतील त्रेपन्नाव्या सूरे नज़ममधील भाग मुहंमद म्हणत होते. "अल-लात, अलउजा, मनात् यांच्याविषयीं काय?" जवळच एक मूर्तिपूजक होता. तो मोठ्याने म्हणाला, "त्या परमेश्वराच्या कन्या. त्याहि ईश्वराजवळ भक्तांसाठी रदबदली करतील." जुन्या धर्मातील या तीन चंद्रदेवता. काबाच्या मंदिरांत यांच्या मूर्ति होत्या. अल्ला त-आला म्हणजे सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या त्या मुली असें मानीत. "या देवतांचं काय?" असें मुहंमद म्हणत आहेत तोच तो मूर्तिपूजक म्हणाला, "त्याहि देवकन्या. त्या खऱ्या आहेत." इतर लोकांस, आसपास जे होते त्यांना, वाटले की कुराणांतीलच हे शब्द आहेत. या देवतांना कुराण मान्यता देत आहे. कुरेश आनंदले. कोणी म्हणतात की मुहंमदांचा हा तडजोडीचा प्रयत्न असावा. त्या विचारांच्या तीव्रतेत असतांना "त्याहि देवता आहेत." असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले. "त्या देवतांना मान द्या. ईश्वराजवळ तुमच्यासाठी क्षमेची रदबदली त्या करतील. म्हणून त्या परमेश्वरासमोर नमा, लवा. त्याची सेवा करा." आणि जमलेले तमाम सारे लोक लवले, प्रणाम करते झाले. सर्वांना बरें वाटलें. तडजोड जणुं झाली. मक्केचा द्वितीय धर्म झाला. परंतु मुहंमदांच्या चित्ताला चूकचूक लागली. नाहीं, या परमेश्वराच्या कन्या नाहींत. तो परमेश्वर कोणाचा
७२ ।
पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/८६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे