Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हे चरण म्हणतांच व ते ऐकतांच मुहंमद एकदम उठतात व आपला झगा काबच्या अंगावर घालतात! हा झगा काबच्या कुटुंबांत सांभाळण्यांत आला होता. पुढे मुआवियाने चाळीस दिरहमला तो विकत घेतला. पुढे तो झगा अब्बासींच्या हातीं गेला. शेवटीं तुर्की सुलतानांजवळ गेला. या झग्याला 'खिरका-इ शरीफ' पवित्र झगा असे म्हणत. अत्यंत आणीबाणीच्या वेळेस या झग्याचें राष्ट्रीय निशाण करीत. काबने जी कविता म्हटली तिचे नांव 'कसीदे बानत सुआद' असे आहे. कोणी 'कसीदत-उल-बुर्दा' म्हणजे झग्याचे काव्य असेंहि नांव देतात.

回 回 回





जातिजमाती इस्लामी होत होत्या. अरबस्थानांतील विरोध मावळत होते. नवराष्ट्र निर्माण झालें. रक्तपात, सूड, भांडणे बंद पडली. तो उत्साह, तें शौर्य आतां धर्माकडे वळली. अजून काबाच्या मंदिरांत जे मूर्तिपूजक होते त्यांच्याविरुद्ध पैगंबरांनी फर्मान काढले नव्हते. ते लोक जुने परंपरागत धर्मविधि अद्याप करीतच होते. परंतु अतःपर या जुन्या गोंधळास आळा घालण्याचें मुहंमदांनी ठरविलें. अद्याप जे नवधर्मात अंतःकरणपूर्वक सामील झाले नव्हते, त्यांची मनें
१३२ ।