Jump to content

पान:इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मरतां मरतां म्हणाला, "पैंगबरांसाठीं मी माझें रक्त दिलें. जनतेच्या कल्याणासाठी मी माझें रक्त ईश्वराला देत आहें. बलिदान करण्याचा मान मला ईश्वराने दिला म्हणून त्याचे आभार !" शेवटी म्हणाला, "हुनैनच्या घळींत लढतांना जे मुसलमान मेले, त्यांच्या कबरांजवळच मलाहि पुरा."
 औरवाच्या जिवंतपणीच्या प्रवचनांचा परिणाम झाला नाहीं, परंतु या आसन्न-मरण प्रवचनाचा त्याच्या लोकांवर परिणाम झाला. त्यांनीं मुहंमदांकडे शिष्टमंडळ पाठविलें. वाळवंटांतील कधीं न संपणाऱ्या युद्धांचा त्यांनाहि कंटाळा आला असेल. शिष्टमंडळ आले व पैगंबरांस म्हणाले, "आम्हांस क्षमा करा व इस्लामच्या गोटांत घ्या." पुन्हां म्हणाले, "आमच्या मूर्ति मात्र कांहीं दिवस राहूं देत." प्रथम म्हणाले, "दोन वर्षे." नंतर म्हणाले, "एक वर्ष." पुन्हां म्हणाले, "सहा महिने, निशन एक महिना तरी."
 परंतु मुहंमद या गोष्टीवर कधींच तडजोड करायला तयार नसत. ते म्हणाले, "इस्लाम व या मूर्ति एक क्षणभरहि एकत्र राहू शकणार नाहींत."
 मग ते म्हणाले, "आम्हांला रोजच्या प्रार्थनेची तरी सक्ति नका करूं," पैगंबर म्हणाले, "प्रार्थनेशिवाय धर्म म्हणजे शून्य!"
 शेवटी त्यांनीं सारे कबूल केलें. फक्त स्वतःच्या हातांनी मूर्ति फोडणें त्यांनी नाकारलें. अब सुफियान व मुघीरा यांना ते काम देण्यांत आलें. तायेफमधील मायाबाया हायहाय म्हणत होत्या व मूर्ति फुटत होत्या!
 या वर्षी यमन, महर, ओमान, बहरैन, यमामा वगैरे ठिकाणचींहि शिष्टमंडळे आली. एक ताई नांवाची जमात अद्याप त्रास देत होती. प्रख्यात हातिम- ताईचा मुलगा 'अदि' तो त्यांचा पुढारी होता. अली त्यांच्यावर सैन्य घेऊन गले. अदि सीरियांत पळाला. इतरांना कैद करण्यांत आलें. त्यांत अदीची बहीणहि होती. सर्वांना सइस्लामी संस्कृति । १२९न्मानानें मदिना येथे आणण्यांत आलें. पैगंबरांनी सर्वांना स्वतंत्र केले. त्यांना देणग्या दिल्या. अदीची बहीण सीरियांत त्याच्याकडे पाठविण्यांत आली. तिनें आपल्या भावास मुहंमदांच्या उदात्त वर्तनाविषयीं सांगितले. अदीचं हृदय कृतज्ञतेने भरून आले. तो मुहंमदांच्या चरणांशी आला व इस्लामचा स्वीकार करता झाला.

इस्लामी संस्कृति । १२९