सभा जोरांत चालली. प्रक्षुब्ध होतें वातावरण. हा जीवनमरणाचा प्रश्न आहे असें म्हणू लागले.
"मुहंमदांस येथून हाकलून द्यावे." कोणी म्हणाले.
"त्याला मरेतों तुरुंगात ठेवावें." दुसरे म्हणाले.
"त्याचा खून करावा." आणखी कांहींनी सुचवलें.
अनेक सूचना येऊं लागल्या. एकाने खून केला तर त्याचे सारे कुटुंब व तो यांच्याबरोबर हाशिमांची व मुत्तलिबाची सूडाची लढायी सुरू होईल. तेव्हा एकट्यानें खून करणं हे बरें नाहीं. "मी युक्ति सुचवितों" अबुजहल म्हणाला.
"अबुजहल म्हणजे अबुल हिकम-अकलेचा बाप. सांगा तुमची युक्ति सांगा." लोक म्हणाले.
"निरनिराळ्या कुटुंबांतून मारेकरी घ्यावे. त्यांनी एकदम मुहंमदांच्या अंगांत तरवारी खुपसाव्या. म्हणजे खुनाची जबाबदारी त्या सर्वांवर येईल. मुहंमदांच्या नातलगांना या सर्वांच्या घराण्याशी मग सूडाची लढाई करावी लागेल. तशी ते करणार नाहीत. त्यांची हिम्मत होणार नाही."
"वा! असेच करावें." सारे म्हणाले.
अबुल हिकम याला अबू जहल हे नांव मुहंमदांनी दिले होतें. अबुजहल म्हणजे अज्ञानाचा बाप, ज्ञानाचा बाप नसून हा मनुष्य अज्ञानाचा बाप आहे, असे मुहंमद म्हणत. महाकवि सनाई म्हणतो,
"अहमद-इ-मुर्सल निशिस्त कैरवा दारद खिरद."
"दिल असीर-इ-सीरत-इ-बू जहले-इ-काफिर दाश्तन."
तुमच्यामध्यें पैगंबर बसले असतां तुमची बुद्धि तुमच्या हृदयाला अश्रद्धाळु अबुजहलच्या गुणाचें गुलाम होऊ देणार नाहीं.
असो. त्या रात्री मुहंमदांच्या घराभोवती मारेकरी निरनिराळ्या स्थानी बसले. मुहंमद पहाटे तरी बाहेर येतील, अशी त्यांना आशा होती. मधून- मधून ते खिडकींतून डोकावत. परंतु मुहंमद कधींच खिडकींतून पळून गेले होते! अली मुहंमदांच्या बिछान्यावर पडून राहिला होता. मुहंमदांनी आपले हिरवें वस्त्र त्यांच्या अंगावर घातले होते. मुहंमदच झोपले आहेत, असें मधूनमधून
इस्लामी संस्कृति । ८९