या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पाऊसकाळात पाऊस येई. डोंगर उतारावरून सरकन् . . भरकन् पळे. उतारावरून नदीकडे धावे. मग डोंगर आपले कोरडेच राहात. चार महिने थोडी-फार हिरवळ दिसे इतकेच! एरवी जिकडे तिकडे भकास डोंगर. दगड गोटे यांनी भरलेले. उन्हाने भाजताहेत. वाटसरूंना विसावा नाही झाडांचा. पाहावे तिकडे भकास.
कुरणवाडीला पाणी लांबून आणावे लागे. भर पाऊसकाळातही पाणी आणायचे तर डोंगर उतरून खाली यायचे. वैनगंगेकाठची शिवा थोराताची विहीर गाठायची. डोकीवर दोन घागरी. कमरेवर कळशी. तोल सांवरीत डोंगर चढायचा. जीव घुसमटून जात असे. अंग घामेजून जाई. धाप लागे. कपाळावरचे कुंकू. ते भिजून नाकावर
४