Jump to content

पान:इत्ता..इत्ता..पाणी.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुढे आली. हिराचे तोंडाशी तोंड नेऊन, आत हवा भरू लागली. छाती चोळू लागली. आईला बोलावले. हातपाय चोळायला सांगितले. दहा मिनिटे, दहा तासांसारखी नाही तर दहा युगांसारखी. लांबच लांब वाटलेली. पण हिराने डोळे उघडले नि जोराचा सुस्कारा दिला.

 हिराची सासू मंजुळा. तिने सविताला जवळ ओढले. पाठीवरून हात फिरवला. दोघींचे डोळे भरून आले. सविता सखुमायची धाकटी लेक. यंदा दहावी पास झाली. आता कालिजात जाते. या गावात चौथीपर्यंतच शाळा आहे. पण सखूने हट्टच धरला. सविताचे वडील सखाराम कांबळेनी तो मानला. ती लातुरास मामाकडे राहते. सविता गौरी- गणपतीसाठी येथे आलेली. दोन दिवसांसाठी. पण तिनेच