Jump to content

पान:इत्ता..इत्ता..पाणी.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इत्ता.. इत्ता.. पाणी...

शैला लोहिया

 “हिरा पडली.. हिरीत पडली वंऽऽमाय! धावा ओऽऽ कोनी तरी धावाऽऽ" खालून बायांचा एकच कालवा उठला.
 आता धावणार तरी कोण? दुपारची वेळ. गावात बुढी माणसंच. तरणी माणसं गेलीत. मुंबईला नाहीतर नाशकाला. कुणी गवंडी कामावर गेलेत. तर कुणी उसाची तोडणी करायला गेलेत.
 जमिनीला हाताचा टेका देत रानबा लगबगीने उठला आणि दुडकत.. धावत उतारावरून विहिरीकडे जाऊ लागला. विहिरीवर पोचताच धाडकन उडी घेतली. एक डुबकी, दुसरी डुबकी. तरी हाती हिरा लागेना.. शेवटी तिसरी डुबकी घेतली आणि हिराचे केस हाती आले. रानबा घामेजून गेला. मिनतवारीने तिचे ओझे कडेला आणले. वरती बायांची रेटारेटी. आता वर कसे जायचे?. वर काही दणकट तरुण पोरी नि सुना. डोके चालवून दोर खाली टाकला. हिराला वर काढलं. पोट छाती दाबून पाणी

काढले. तोंडातून पाणी. . कढी. भात बदा बदा बाहेर आले. छातीचा भाता मंद चालत होता. जणू थांबलाच आहे असा. डोळेही मिटलेले. सखुमायची सविता घाईने