तरी बाया मरतात. भरली घागर घेऊन डोंगर चढावा लागतो. हापसा करा नायतर जुनी हीर आहे. तिचा गाळ काढा. असा धावा कितीदा धरला मी? सांगाना खरं. आमी निवडून आलेल्या बहिणी. सहीसाठी आमची जागा. तेवढाच आमचा उपयोग. कंदीतरी आमचा बी इचार घ्यावा!"
बोलता बोलता धाप लागली. हरिभाऊ पण हबकून गेले.
बी. डी. ओ सायबांनी समजावले.
"ताई,किती चांगलं बोललात. सभेतपण असं बोलत ज़ा. मग सभापतींना काम करावंच लागेल. बहिणींनी हेका धरावा. नि भावांनी तो पुरवावा.
तुम्हा बहिणींची मागणी खरी आहे. या डोंगरातली सारीच गावे पाण्याविना भकास आहेत. विहिरीचे पाणी आटलेले. नवी विहीर खोदली तरी पाणी लागेल अशी आशा नाही. यात दैना बायांची होते. पाणी भरता भरता कंबर वाकून जाते. जीव थकून जातो. मी बी लहान गावातच वाढलोय." "होय साहेब. जीवनातला सारा आनंद नासून जातो." सखूबाई बोलू लागली.
"सविता नसती, तर हिराची लाश हाती लागती. ही भागूबाय बघा, साठी जवळ आलीय. पण दिसते सत्तरीची. माजी चाळीसी आलीय. पन आमी बाया ऐन
पान:इत्ता..इत्ता..पाणी.pdf/१३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०