पान:इत्ता..इत्ता..पाणी.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचार. "या खेडवळ बाया जाणार कुठे आणि कशाला?"

 पंचायत समितीचा सभापती हरीभाऊ. चाटे आणि बी. डी. ओ. साहेब आनंदा जाधव. सारेच चकित झाले. सामोरे गेले. बायांना सावलीत बसवले. हरिभाऊ बोलू लागले.
 "बहिणींनो, भर उन्हात चालत आलात. कोनची अडचण आली? मला सांगायचं. सांगावा धाडायचा. मी सोता आलो असतो. मी तुमचा भाऊ पाठीशी हाय."
 ते ऐकताच केशरबाई खवळली. बोलू लागली, "भाऊ, खरं काय ते बोला. उगा नाटक नको. किती दिवसांपासून सांगतेय. डोंगरात प्यायाला पानी नाही. पानी भरलेले टँकर, टाक्या बैलगाडीवर घालून किती गावांना पाठवनार? ते पानी कुना कुनाला पुरनार? कुरणवाडीत दरसाली दोन