पान:इतिहास-विहार.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
केळकरांचे लेख

डफसाहेबांच्या टीपांमधील ज्यांचा उल्लेख केला होता व नव्हता असे बरेच कागदपत्र अलीकडे सांपडल्यामुळे डफसाहेब अस्सल कागदपत्र जाळण्याच्या घोर आरोपांतून मुक्त झाले ही गोष्ट न्यायदृष्टीने फार उत्तम झाली यांत काही शंका नाहीं; तथापि अप्रामाणिकपणा सोडला तरी ज्यास कदाचित त्यांचा स्वतःचा उपायहि चालण्यासारखा नव्हता असे इतिहास- कार या नात्याने त्यांच्या अंगी असलेले दोष त्यांच्या ग्रंथांत ढळढळीतपणें दिसून येतात. इंग्रजांचा व मराठ्यांचा जेथे जेथे संबंध आला तेथे तेथे फसाहेबांनी इंग्रजांच्या बाजूचा मात्र सविस्तर वृतांत दिला आहे, पण मराठ्यांची बाजू मात्र अगदी जुजबी तेवढीच दाखविली आहे. इतरत्रह मराठ्यांमधील दुय्यम किंबहुना, पहिल्या प्रतीचे योद्धे, मुत्सद्दी, कर्ते पुरुष, . तसेच मराठ्यांची भाषा, तीमधील प्रसिद्ध ग्रंथकार व महाराष्ट्रांतील साधुसंत, त्याच्या रसाळ वाणीचे समाजावर झालेले परिणाम; निरनिराळ्या वेळची समाजस्थिति व तिची कारणे, धार्मिक विषयावरील समजुती, आचारविचार ग्रामव्यवस्था, व्यापारकला यांविषयींचा मागमूस तरी त्या ग्रंथांत सांपडेल कायः १ वरील प्रकारचा दोष उफसाहेबांचे हातून माहिती अपूर्ण असल्या- -मुळे झाला असेल असें संभवत नाहीं. तो साधनाचा दोष नसून त्यांच्या इच्छेचाच दोष होता, हैं अलिकडे उपलब्ध झालेल्या ज्या कागदपत्रांवरून अप्रामाणिकपणाच्या दोषारोपांतून ते मुक्त झाले त्याचं कागदपत्रांवरून सिद्ध' होतें. तर्सेच दुरभिमान; हेकटपणा व थोडासा मत्सर हेहि मानुषते सुलभ असलेले दोष त्यांचे ग्रंथामध्ये दिसून येतातंच. सदरहू ग्रंथकारा इंग्रज तेवढे भले व इमानी माणूस दिसतात व मराठे तेवढे कपटी व कुटिल मनाचे असे भासतात. इंग्रजलोकांचे हातून ज्या चुका त्या काळी घडल्या व नैतिकष्टया जे अपराध घडले त्यांचे समर्थन करावें या गोष्टीकडे त्यांचा बहुधा कल आहे. शिवाजीने अफझुलखानाला विश्वासघाताने ठार मारिलें; नाना फडणविसानें आपल्या धनिणीशीं जारकर्म केलें; मराठे सरदार तितके लुटीसाठी हपापलेले, बेइमानी व खोडसाळ स्वभावाचे, ब्राह्मण मुत्सद्दी तेवढे सारे अधिकारमदाने धुंद होणारे, भ्रष्ट व तुझे.इत्यादि जी कित्येक निराधार विधाने 'उफसाहेबांनी केलेली आहेत त्या सर्वांचे बीज 'हेच आहे की, साहबमजकूर हे विदेशी होत, तात्पर्य, इंग्रज-