पान:इतिहास-विहार.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण

९३

मिळाली तरी त्यांतील स्वारस्य त्यांस चांगल्या प्रकारें कळणे फारसें शक्य नसतें हें साहजिकच आहे. इंग्रज ग्रंथकारांनी हिंदुस्थानच्या इतिहासावर जे ग्रंथ लिहिले आहेत, ते साता समुद्रांपलीकडे राहणाऱ्या इंग्लंडांतील वाचकांसाठींच लिहिले आहेत. त्या वाचकांस जी काय माहिती पाहिजे असते ती ही की आम्ही हिंदुस्थान कसें जिंकले. तेव्हां हीच माहिती . सदरहू ग्रंथकार आपल्या हिंदुस्थानच्या इतिहासांतून देतात हैं स्वाभाविकच आहे. प्रसिद्ध इतिहासकार अँटडफ व इंग्लंडांतील प्रसिद्ध छापखानेवाला मरे यांजमध्ये अँटडफचा इतिहास छापण्याचे वेळी झालेला पत्रव्यवहार प्रसिद्धच आहे. यास्तव त्याचा आम्ही येथें विशेष रीतीने उल्लेख करीत नाहीं. त्यासंबंधानें येथें सांगण्यासारखी मुद्दयाची गोष्ट एवढीच कीं, अँट- shaho arा इतिहासप्रियतेमुळे अनिवार श्रम घेऊन व शेवटीं हजारों रुपयांची नुकसानी सोसून जो इतिहास लिहिला त्यांत सुद्धां वर . लिहिल्याप्रमाणें 'आम्हीं हिंदुस्थान देश कसा जिंकला' या दृष्टीनेच बहुतेक इतिहास लिहिलेला आहे व त्यांत मराठ्यांच्या बाजूची अशी फारच थोडी . माहिती दिलेली आहे. असें असतां ज्यांची दृष्टि केवळ हिंदुस्थानच्या नांवावर . आपल्या लोकांच्या बढाईंच्या गोडशा गप्पा पिकवून चार पैसे उकळावे एवढ्यापुरतीच, अशांच्या " 'हिंदुस्थानच्या इतिहासां "नीं आमची हौस कशी भागेल हें दिसतेंच आहे. मालकमचा मध्य हिंदुस्थानचा इतिहास, . टॉडचें राजस्थान, बुझ्ल्कसाहेबाचा म्हैसूरचा इतिहास इत्यादि ग्रंथांतून एत- द्देशीयांविषय त्या त्या ग्रंथकारांनीं आपल्या मतें भरपूर माहिती दिली आहे, तथापि एतद्देशीयांच्या दृष्टीने ती अपुरी व एकदेशी आहे हे खेदानें कबूल करावें · लागतें. या पलीकडे गेलें असतां मरे, मॉरिस वगैरे सटरफटर इंग्लिश ग्रंथकारां- च्या इतिहासाविषयीं मुळीं बोलावयासच नको. अँटडफ इतका निःपक्ष- पातबुद्धीने लिहिणारा इतिहासकार दुसरा कोणीच झाला नाहीं. ही गोष्ट . एका अर्थी निर्विवाद आहे.. परंतु त्याच अँटडफची गोष्ट घेतली असतां असें सिद्ध होतें कीं, परकीयानें परकीयांचा उत्तम इतिहास लिहिणें जवळ जवळ अशक्यच आहे. डफसाहेबांवर अप्रामाणिकपणाचे वगैरे निंद्य आरोप पुष्कळांनी केले होते. प्रारंभीं रा० ब० कीर्तने यांनी आपल्या टीकेमध्ये त्या भारोपाचा प्रसिद्धपणें व धिटाईनें प्रथम उद्गार काढिला, परंतु पुढे