पान:इतिहास-विहार.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण

९५

लोकांनी लिहिलेले हिंदुस्थानचे इतिहांस कचित् दुष्टपणा व मत्सरी.. लिहिलेले बहुधा अपूर्ण व सर्वथा एकदेशीय असे असल्यामुळे प्रारंभ सांगितलेल्या प्रकारचा इतिहास लिहिणारास त्या ग्रंथांवर आपलें साधनं म्हणून फारसें अवलंबून राहतां येणार नाहीं, हें सहज दिसून येईल.

 राहतां राहिली तिसऱ्या प्रकारचीं साधनें म्हणजे आमचेकडील लोकांनी लिहिलेल्या कादंबऱ्या व नाटके या सर्वोसंबंधानें एकच शेरा मारतां येण्यासारखा आहे. तो असा कीं, आमच्यांतील भावी इतिहासकारास " त्यापासून बिलकूल मदत होणार नाहीं. एवढेच नव्हे, तर त्यानें त्या ग्रंथांचें होता होईतों मुखावलोकन सुद्धां न केलें तर बरें, प्रथमतः आधीं तीं नाटके व कादंबऱ्या म्हणजे इंग्रजी इतिहास, जुन्या बखरी यांतील इकडचा तिकडचा मजकूर गोळा करून त्यांतच आपल्या तर्कटाची भेसळ करून लिहिलेली चोपडी होत. यामुळे इतिहास या नात्याने सर्वोर्शी त्याज्य होतं. आमच्यांतील ऐतिहासिक नाटककार किंवा कादंबरीकार आपण ज्या. गोष्टीविषयी लिहितो त्याविषयी तोपर्यंत अनुपलब्ध असलेल्या माहितीचा * शोध करून मुख्यतः अशाच माहितीपासून उत्पन्न होणाऱ्या चमत्कृतीनें जनरंजन करणें हेंच आपले कर्तव्य आहे असे समजत नाहींत व आपण : शिजविलेल्या खिचडीत खरें ऐतिहासिक द्रव्य किती व केवळ स्वकपोल- कल्पित गोष्टीचा मसाला किती आहे याचा नीट उल्लेख करीत नाहींत ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. बोहिमिआच्या किनाऱ्यावर शेक्सपिअरने जहाज आणून उतरविलें आहे या गोष्टीचे आपण कौतुक करतों खरें, परंतु बोहिमिआ देशाचें विश्वसनीय असें भूगोलवर्णन शेक्सपिअरने नाटकं लिहिण्यापूर्वीच पक्के ठरून गेलें आहे ही समाधानकारक गोष्ट लक्षांत आणूनच शेक्सपिअरच्या कृतीचें कौतुक करण्यास आपले अंग विनोद 1. उरतो. परंतु तेंच शेक्सपिअरच्या नाटकांतील उल्लेखावरूनच बोहिमिय देशाचें भूगोलवर्णन जर आपल्यास ठरवावयाचे असेल तर वस्तुस्थितीचा इतक्या चमत्कारिक रीतीनें विपर्यास केल्यामुळे एरवी आपणास होणारा विनोद सुचला नसता । याच गोष्टीचे धोरण इकडेहि लावावयाचे आहे. मराठ्यांचा इतिहास अजून निश्चित व्हावयाचा आहे व त्यांतील कित्येक प्रसंग व कित्येक ऐतिहासिक स्त्रीपुरुष यांचे स्वभाव वगैरे गोष्टी डळमळत
के... ७