पान:इतिहास-विहार.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९२
केळकरांचे लेख

व परिशीलन करून अलीकडील पद्धतीप्रमाणे केवळ इतिहास या दृष्टीनें बहुतेक चखरी लिहिलेल्या असाव्या असे साधारणतः दिसत नाहीं, . यामुळे त्यांच्या विश्वसनीयतेबद्दलचा संशय दुणावतो. पुष्कळ बखरींतून तर घडीत चुकाच सांपडतात व चटसाऱ्यांमधून पक्षपातीपणा, धर्मभोळेपणा वगैरे खऱ्या इतिहासास अगदी घातुक अशा गोष्टी कमीअधिक प्रमाणानें आढळून येतात. स्वपक्षपातीपणा हा गुण आहे खरा; परंतु तो खऱ्या इतिहासास बाधक असतो व यामुळे जुन्या बखरी 'जरी महत्त्वाच्या आहेत तरी त्यांचे महत्त्व सोनें मिसळलेल्या मातीइतकेंच आहे. म्हणजे त्यांतील खरोखर माह्यांश स्वल्प असतो व तो निराळा काढण्यास पुष्कळ परिश्रम व शोधकपणा लागतो. आतां सर्वच बखरी वाईट आहेत असा आमच्या म्हणण्याचा उद्देश नाहीं, परंतु बऱ्याच बखरींसंबंधानें तसे म्हणता येईल, या सर्वाचाहि उपयोग आहे, परंतु तो त्या बखरी आज ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत होणारा नसून पुढें कधींकाळीं अवांतर अस्सल - माहिती मिळून त्यांतील गोष्टींचा खरेखोटेपणा ठरवितां आल्यानंतरचा आहे. बखरींवर जे आक्षेप साधारणतः येतात ते हल्लीं ऐतिहासिक लेखसंग्रहांत जी पत्रे प्रसिद्ध होत आहेत त्यांसारख्या कागदपत्रांवर मुळींच आणतां येत नाहींत ही मुद्दयाची गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे. सदरहू कागद- पत्र बनावट असतील एवढाच काय तो आक्षेप त्यांजवर येण्यासारखा आहे. परंतु त्याचें निरसन करणेंहि फार सोपें असतें व अशा रीतीनें त्यांची स्वत:- ची सत्यतेची एकदां शाबिती झाली म्हणजे मग त्यांत असणाऱ्या मजकुराच्या खरेखोटेपणाबद्दल वाद उत्पन्न होण्याचा मुळींच संभव नसतो. बखरी- मध्यें ज्या गोष्टी इतिहासास बाधक म्हणून त्याज्य होतात त्याच ऐतिहासिक लेख संग्रहांतल्या व त्यासारख्या इतर कागदपत्रासंबंधानें इतिहासाचा भागच या नात्यानें ग्राह्य व मनोरंजक होतात.

 इंग्रजी इतिहासासंबंधानें पहातां बखरींतील कांहीं कांहीं दोष त्यांजमध्यें दिसून येत नाहींत हें खरें, तथापि ते इतिहास वर वर्णन केलेल्या प्रकारच्या बखरीवरूनच विशेषतः रचिलेले असतात, हाच प्रथमतः त्यांच्यावर मोठा : आक्षेप आणतां येतो. हे इतिहासकार विदेशीय असल्याकारणाने त्यांस अस्सल ऐतिहासिक माहिती मिळणे व ती