पान:इतिहास-विहार.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण

९१

इष्ट आहे कीं, ज्यामध्ये विपुल परंतु विश्वसनीय माहिती दिलेली असून, मार्मिक, परंतु निःपक्षपाती टीका केलेली असेल. तसेंच मराठयांचे काळचे आचारविचार, कायदेकानू, रीतभात, पोषास्त्रपेहराव, उद्योगधंदे, हत्यापात्रे इत्यादि इतिहासाच्या महत्त्वाच्या उपांगांचे ज्यांत विवेचन, कैलेलें आहे व मराठ्यांच्या काळची खरी स्थिति, त्यांचे गुणावगुण वगैरे गोष्टींविषयी योग्य ज्ञान मिळून हल्लींच्या बदललेल्या स्थितींतहि ज्याचे वाचनापासून सदुपदेश व वैभवाकांक्षेची स्फूर्ति उत्पन्न होईल अशा मराठ्यांच्या इतिहासाची वाण आहे ती होईल तितक्या लवकर दूर करण्याचा प्रयत्न करणें हें प्रत्येक महाराष्ट्रीयाचे कर्तव्य आहे, ही गोष्ट इतरांप्रमाणें आम्हांसहि कबूल आहे. परंतु ती उणीव भरून काढण्याचे जे मार्ग आहेत त्यामध्ये इतिहासाची सामुग्री मिळविणें हा मार्ग अधिक महत्त्वाचा व' अधिक्न श्रेयस्कर आहे. असे आम्हांस वाटते. सुवर्ण हवे तितकें संग्रहीं असले म्हणजे सोनारांचा खरा उपयोग पुढे लागतो. परंतु तोपर्यंत खाणीत शिरून शोधकदृष्टीने व दीर्घोद्योगाने कणाकणांनी सोनें जमविणाच्या मजुरांचाच उपयोग अधिक आहे ही गोष्ट निर्विवाद होय, पूर्वजांचे नुसते गुणानुवाद गाण्यापेक्षां त्यांच्या हातची बोटभर पण अस्सल चिठ्ठी मिळविली असता ऐतिहासिक दृष्टया तर आपण मोठी कामगिरी केली असे होतें, एवढेच नव्हे पण पूर्वजांविषयींचा खरा व टिकाऊ अभिमानं उत्पन्न झाला तर याच मार्गाने होईल. वर सांगितलेल्या प्रकारच्या इतिहासाची सामग्री जुन्या बखरी, इंग्रजी इतिहास, व मराठीतील ऐतिहासिक कादंबऱ्या व नाटके इत्यादिकांमधून कमीअधिक प्रमाणाने पेरलेली सांपडते हैं खरें आहे व त्यांतील ग्राह्यांश घेण्यास कोणाचीहि हरकत असणार नाहीं. तथापि त्यांचं महत्त्व अस्सल कागदपत्रांइतकें कर्धीहि असू शकणार नाहीं, हे उघड आहे.

 प्रथम आपण बखरी घेऊ. हल्ली उपलब्ध असलेल्या बखरींमध्ये त्यांतील इतिहास घडण्याचे काळीच लिहिलेल्या अशा बखरी फारव योच्या सांपडतील, बहुतेक बखरी त्यांतील इतिहास घडून आल्यानंतर बन्याच काळाने लिहिलेल्या आहेत. या गोष्टीमुळेच त्यांच्या विश्वसनीयतेस थोडासा भक्का बसतो त्यातूनहि जुने कागदपत्र वगैरे माहितीचे शोधना