पान:इतिहास-विहार.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केळकरांचे लेख.

यांच्या कारकीर्दीत झालेली देशस्थ व कोंकणस्थ मुत्सद्दी यांजमधील भांडों ब. त्यांच्यापासून निज़ामअल्लीने करून घेतलेला फायदा, यासंबंधानें आजपर्यंत कोणत्याच इंग्रजी अगर मराठी इतिहासांत माहिती आलेली नाहीं, ती ऐ. ले. संग्रहांत सांपडते. म्हैसुरावर मराठ्यांनी ज्या स्वान्या केल्या त्यांची सविस्तर व विश्वसनीय अशी माहिती आजपर्यंत मिळाली नव्हती; ग्रँट डफनें कर्नल विल्कस यांचे इतिहासावरून दिलेली माहिती थोडी आहे व गैरविश्वसनीय दिसते. त्यासंबंधाने बरीच माहिती ऐ. ले. संग्रहांत मिळेल. तसेच इ. स. १७७५ पासून १७८० पर्यंत मराठ्यांचे व इंग्रजांचें युद्ध सुरू होते. त्या वेळची इंग्रजांच्या बाजूची हकीकत फॉरेस्टसाहेबांनी प्रसिद्ध केली आहे, त्यांत मराठ्यांची बाजू दाखविली - गेलेली नाहीं. त्याही संबंधानें मेळ व फरक पाहण्यास लागणारी माहिती ऐ. ले. संग्रहांत बरीच मिळेल. खर्च्याची लढाई व बाजीरावशाहीतील धामधूम यांचीहि हकीकत या मासिकपुस्तकांत बरीच सांपडणार आहे. ( चौदाव्या अंकापुढे येणाऱ्या हकीकतीत नवी अशी माहिती कोणती येणार असे आम्हीं रा० खरे यांस विचारल्यावरून त्यांनी वरील माहिती आम्हांस कळविली आहे) व एकंदरीनें पाहतां निदान एक गोष्ट स्पष्ट दिसून येते ती ही की, मराठ्यांच्या इतिहासांत प्रमुखत्वास आलेल्या दुय्यम प्रतीच्या पुष्कळ वीरमुत्सद्दयांची माहिती अँटडफ किंवा इतर कोठें फारशी मिळत नाहीं ती, ऐ. ले. संग्रहांत मिळणार आहे व पत्रव्यवहारांत ती - गोंवली गेली असल्याकारणानें ती अस्सल असून विशेष चटकदार लागण्याचा फार संभव आहे. तात्पर्य, ऐ.ले. संग्रहाचे योगानें जुन्या माहिती- वर नवीन ज्ञानाचा प्रकाश पडेल एवढेच नव्हे, तर नवीन अशीहि पुष्कळ मिळेलसें दिसतें.

-३-

मराठ्यांच्या इतिहासाचे हल्लींचे स्थितींत इतिहास लिहिण्यापेक्षां इति- हासाची साधने मिळतील, तितकी जमविणे हेच काम विशेष महत्वाचें आहे व या दृष्टीने पाहातां रा० खरे यांचे मासिक पुस्तक अत्यंत उपयुक्त होय. पुढे मागें केव्हांतरी असा एखादा मराठ्यांचा इतिहास तयार होणे