पान:इतिहास-विहार.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण

८९

तेव्हां मोगलानें कुरापत काढून पुनः पेशव्यांशी लढाई सुरू केली. इकडे - पेशव्यांनी वन्हाड, औरंगाबाद, बेदर, भागानगर हे प्रांत लुटले. मोगलानेंहि ॐ पुण्यास येऊन पुणें खुटिलें व जाळिलें आणि आसपासचा थोडाबहुत प्रदेश बेचिराख केला. थोड्याबहुत खंडण्याहि वसूल केल्या व अशा रीतीनें नासाडी करून मोंगल परत गेला. इतकी हकीकत पहिल्या तेरा अंकांत आलेली आहे.

 यापुढे मोगल व पेशवे यांचें राक्षसभुवन येथें मोठें युद्ध होऊन पेशव्यांना यश आलें, मोगलांच्या फौजेचा विध्वंस झाला व तहामध्ये पूर्वी जिंकलेला ६२ लक्षांचा मुलुख सबंध परत मिळून आणखीहि २० "लक्षांचा मुलुख मोंगलानें पेशव्यांस दिला वगैरे मजकूर पुढील अंकांतून येणारा असावा असें दिसतें. रा० खरे यांनी पत्रे छापतांना त्यांच्या - पैवस्ती वगैरे दिल्या आहेत. मजकुरांत जीं नांवें किंवा जीं अनुसंधान आली असतील त्यासंबंधाची माहिती विपुल टीपांच्या रूपाने दिलेली आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वतंत्र प्रकरण सुरू होण्याचे पूर्वी त्यासंबंधांच्या पत्रांचा सारांश सुसंबद्ध रीतीनें दिलेला आहे. या सर्व गोष्टींमुळें - अनुसंधान बहुतकरून चुकत नाहीं व पत्रांतील तुटक वाक्यें, अस्पष्ट उल्लेख व सांकेतिक शब्द यांचा अर्थ बराच समजतो. रा० खरे यांच्या विस्तृत इतिहासज्ञानाचा उपयोग वाचकांस कितपत होतो हैं पहाणें असेल. तर कांहीं पत्र टीपा न पहातां वाचावी म्हणजे समजून येईल.

 ऐ. ले. संग्रहासंबंधानें दुसरी एक गोष्ट ध्यानांत ठेवण्यासारखी आहे ती ही की, यामध्ये कांहीं कांहीं माहिती अशी प्रसिद्ध होत आहे की, ती खरोखर आजपर्यंत अगर्दी अनुपलब्ध होती. आजमितीस माहीत असलेल्या ऐतिहासिक प्रसंगांसंबंधानें या लेखसंग्रहांत नवीन वर्णन व निरनिराळ्या इकीकती सांपडतात. इतकेंच नव्हे, परंतु आजपर्यंत फारसे माहीत नसलेले . असे ऐतिहासिक प्रसंगहि कचित् नवीन सांपडतात. माधवराव - पेशव्यांच्या कारकीर्दीच्या पहिल्या दोन तीन वर्षांचा इतिहास अँटsफसाहेबांनी फक्त सहासात पृष्ठांत सांगितला आहे. त्याच इति-हासाची हकीकत ज्यामध्यें आहे अशीं पत्रे छापण्यास रा० खरे यांच्या 'पुस्तकाच पांच पानें खर्च झाली आहेत. तसेच श्री० माधवराव पेशवे