पान:इतिहास-विहार.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचे परीक्षण

८७

कीर्दीत अखेरपर्यंत सारखी टिकली. पटवर्धन म्हणजे पेशवाई दौलतीचे आधारस्तंभ म्हणून नांवाजले जात होते. प्रत्येक मोहिमेंत आपली आठ हजार फौज घेऊन सुरकारची पडेल ती कामगिरी करण्यास ते तयार असत व· नाना फडणविसांची कोणचीहि मसलत पटवर्धनांचे सल्लामसलतीशिवाय • सिद्धीस गेली नाही, अशा रीतीनें १७६० सालापासून १८०० पर्यंत सर्व मसलती, उलाढाली व गुप्तकारस्थानें यांमध्ये प्रमुखत्वानं काम केलेल्याच गृहस्थांनी ज्या वेळची त्या वेळी पत्राद्वारे लिहून ठेविलेली हकीकत अत्यंत विश्वसनीय व महत्त्वाची असणार याबद्दल शंका नाहीं. रा० खरे यांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिलेच आहे की, प्रत्येक स्वारीत सैन्याच्या हालचाली, वेढे, लुटालुटी, लढाया, छापे, पाठलाग, फितूर वगैरे जे जे प्रकार झाले त्या त्या स्वारीतील सरदारांनी व कारकुनांनी इत्थंभूत वर्त- मान मिरजेस लिहून कळविलेले आहे.” अशा रीतीनें “- ज्यांनी ज्यांनी स्थानें लढविली व पराक्रम केले व पाहिले त्यांनीच लिहिलेला " इति हास प्रस्तुत पुस्तकाचे द्वारें प्रसिद्ध होत आहे. व तो खरोखरचं फार मनोरंजक आहे हे गेल्या तेरा चौदा अंकांचे वाचनाचे अनुभवाने आम्ही सांगतों, ऐ० ले० संग्रहाचा जितका भाग आमचेपुढे आजमितीस आहे. तेवढ्यावरून तत्कालीन शेंकडों बारीकसारीक गोष्टींविषयीं निबंधरूपानें माहिती देतां येण्यासारखी आहे. शिवाय त्यांतील उत्तम उतारेही काढून देण्यासारखे आहेत. परंतु इतके करण्यास आम्हांस स्थळ व काळ अनुकूल नसल्यामुळे तें काम आम्हांस टाळावें लागत आहे, याबद्दल आम्हांस फार दिलगिरी वाटते.

 आतां या संग्रहांत आतांपर्यंत पेशवाईची किती कारकीर्द वर्णिली गेली आहे, याचा विचार आपण करूं. रा०खरे हे कागदपत्र सालवारीच्या क्रमानें लावून छापीत आहेत. पहिल्या अंकावरून पाहतां १७६० सालापूर्वीचीहि कांहीं थोडीं पत्रें रा०खरे यांस मिळालीं तीं त्यांनी प्रथम छापून घेतली. ह्रीं पत्रे फारच थोडी म्हणजे सुमारे २५ आहेत. १७.६१ सालापासून मात्र पत्रांचा 'भरणा पुष्कळ झालेला आहे. तो इतका कीं, बहुधा तारखेगणीक पत्र मिळाली आहेत. कचित् तर एका तारखेची दोनं दोन तीन तीनसुद्धां पत्रे 'सांपडतात. दुसम्या अंकांत माधवराव बल्लाळ पेशव्यांचे कारकीदीस सुरवात