पान:इतिहास-विहार.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६
केळकरांचे लेख

 असो. आतां आपण खरे यांच्या मासिक पुस्तकाचें खरोखर किती महत्त्व आहे हें पाहूं; हें महत्त्व त्यांतील विषयाच्या सूक्ष्म अवलोकनावरून कळणार आहे. ऐतिहासिक लेखसंग्रहांत प्रसिद्ध होणारी पत्रे कोठून व कशी मिळाली याविषयींची हकीकत पहिल्या अंकांतील संपादकाच्या प्रस्तावनेंतच लिहिलेली आहे. ज्या थोड्याशा दप्तरांतून हल्लींचीं मौल्यवान् प निघाली, अशी दप्तरें सर्व पटवर्धनी जहागिरीत मिळून एके काळी किती असतील व सर्वभक्षक काळ व त्याचेच साहाय्यकारी जे कांहीं इतिहासा - नभिज्ञ व अभिमानशून्य लोक, या उभयतांचे पराक्रमानें त्यांपैकी किती दूसरे मातीस मिळाली असतील याची सहज कल्पना करितां येईल. असो. ० ले० संग्रहांत येणारे लेख मुख्यतः गेल्या शतकाच्या शेवटच्या पन्नास वर्षांतील हकीकतीसंबंधाचे आहेत. हा काल म्हणजे पेशवाई इतिहासाचा गामा म्हटला तरी चालेल. पानपतची लढाई झाल्यानंतर, खासे थोरले माधवराव व सवाई माधवरावाचे कारकीर्दीत प्रख्यातीस आलेले मराठे ब्रध्ब्राह्मण सरदार यांनीं आपलें नष्टवैभव पुन्हा परत आणले व पूर्वीपेक्षां कांकणभर अधिकच लौकिक मिळविला. परंतु पुढे लवकरच आपसांत वैमनस्ये पडून रावबाजींनी इंग्रजांची कांस धरली व शेवटीं वसईचे - तहाचे द्वारें इंग्रजांचें पाऊल महाराष्ट्रांत कायमन्वेंच घुसलें. एवढा सगळा कारभार १८ वे शतकाचे शेवटचे ४० । ४२ वर्षात घडून आला. ऐ० ले० संग्रहांतील कागदपत्र या अशा काळच्या इतिहासासंबंधाचे असल्याने ते महत्त्वाचे आहेतच, परंतु ते नुसत्या इतिहासकारांनी लिहिलेले नसून, 'खुद्द इति 'हासच घडवून आणणारे जे वीर व मुत्सद्दी यांनी व तो इतिहास घडत असतांच लिहिलेले असल्यामुळे विशेष महत्त्वाचे आहेत हे निर्विवाद होय. हे कागदपत्र पटवर्धन सरदारांचे दप्तरांतून घेतले आहेत एवढे सांगितलें म्हणजे त्यांत सर्व आलें, त्यांची निराळी शिफारसच करावयाला नको. पटवर्धनांचे घराणे बाळाजी विश्वनाथ पेशव्याचे कारकीर्दीत मूळ उदयास येऊं लागलें. थोरले माधवरावसाहेब यांचे कारकीर्दीत त्यांस सत्तावीस लक्ष रुपयांची जहागीर मिळाली. श्री. माधवरावसाहेबांचा एकंदरीनें पट- न घराण्यावर चांगला लोभ होता, त्यामुळे त्यांचे कारकीर्दीत पटवर्धनां ची विशेष भरभराट झाली, ती श्री० सवाई माधवरावसाहेब यांचे कार