पान:इतिहास-विहार.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण

८५

योग्यतेस आणण्यास त्याचे संपादकास किती श्रम पडले असतील याची कल्पना मात्र तितकी सहज करितां येण्यासारखी नाहीं.. मिरजेसारख्या मागसलेल्या व साधनविरहित गांवीं राहणें; पोट भरण्याच्या धंद्याचा मागें अक्षय लकडा, डॉ० भांडारकरांची दोन संस्कृत पुस्तकें पढवा- वयाची अशा प्रकारचा नीरस, अनुल्हासी व स्फुर्तिविनाशक व्यवसाय; केवळ जुन्या तऱ्हेने मिळालेलें संस्कृत शिक्षण संस्थानी दसरांची अभेद्यता; कागदपत्रे पाहण्याचे काम कोणत्याहि प्रकारच्या मदतीचा अभाव, नकला बगैरे करण्यास लागणाऱ्या द्रव्यसाधनाची कमतरता; खुद्द मिरजेस छापखाना वगैरे नसल्यानें होणारी विलक्षण गैरसोय व सर्वोहूनहि अधिकः म्हणजे उदार लोकाश्रयाचा अभाव ! या सर्व बिकट अडचणी ध्यानांत आणिल्या असतां, रा० खरे यांच्या मनांत जुन्या इतिहासाबद्दल इतकी कळकळ उत्पन्न व्हावी, व केवळ स्वतःवर अवलंबून राहून त्यांनी इतिहासोद्धाराचे काम इतकी कमाई करावी, हें त्यांस अत्यंत भूषणावह आहे हें कोणीहि कबूल करील. ऐतिहासिक लेखसंग्रहाचें साहित्य सिद्ध करण्यांत आगाऊ गेलेलों ८१९ वर्षे व पुस्तक आगाऊं अबाधित चाल- प्यास पुरेसे तयार असलेले लेख प्रसिद्ध करण्यास हल्लींच्या मानाने लागणारी यापुढील ८९ वर्षे, यांचा विचार केला असतां रा० खरे यांचा साधारणतः एका जन्माचा उद्योगच झाला असें म्हटलें असतां फार गैर होणार नाहीसे वाटतें. थोड्याच दिवसांपूर्वी रा० ब० रानडे यांचे मराठी वाढायासंबंधानें टाइम्स आफ इंडियामध्ये जे लेख प्रसिद्ध झाले आहेत त्यामध्ये प्रसंगानु- साराने असे दर्शविण्यांत आलें आहे कीं, मराठी भाषेच्या अभिवृद्धीचें जें काय श्रेय कोणास असेल त्यामध्ये पदवीधरांपेक्षां बिनपदवीधरांचाच हिस्सा विशेष मोठा आहे. या विषयाप्रमाणेच इतिहासासंबंधानेंहि बिनपदवीधरांना तितकेच भूषण व पदवीधरांना तितकेंच दूषण आहे हैं रा० खरे व त्यांजसारखे आणखी कांहीं इतर गृहस्थ यांचे उदाहरणावरून कबूल करावें लागेल. असो. रा० खरे यांचे मासिक पुस्तकाचें काम दिवसेंदिवस अधिकाधिक सरस होत चाललें आहे. विशेषतः त्याचा नियमितपणा तरी अगदी वाखाणण्यासारखा व इतर बहुतेक मासिक पुस्तकांनी अनुकरणीय आहे. असे आम्हांस वाटतें.