पान:इतिहास-विहार.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४
केळकरांचे लेख

छापण्यास सुरवात झाली असून तीं ग्रंथरूपानें लवकरच लोकांपुढें येतील . ) व सर्वोपेक्षां विशेष सांगण्यासारखा लाभ म्हटला म्हणजे . पुण्यांतील पेशवाईतरांत प्रवेश होऊन त्यांतील निडवक लेख म्हणजे पेशवे - सरकारच्या रोजनिशा वगैरे प्रसिद्ध करण्याची सरकारानें उदारपणानें परवानगी दिली. वास्तविकपणे पहातां या सर्वापैकी फार थोडे अस्सल कागदपत्र आजतागाईत प्रसिद्ध झाले आहेत; व बहुतेक प्रसिद्ध होण्याचे राहिले आहेत. हे प्रसिद्ध होण्यास खर्च बराच लागतो यामुळे ते एकदम ग्रंथ- रूपानें प्रसिद्ध होणे कठीण. मासिक पुस्तकाच्या द्वारानेंच त्यांची प्रसिद्धि होणे सोईस्कर पडते. परंतु काव्येतिहाससंग्रह बंद पडल्यावर भारतवर्ष सुरू होईपर्यंत दुसरें मासिक पुस्तक यासंबंधाने मुळीं निघालेच नाहीं.भारत- वर्षाचे फक्त सातच अंक निघाले. पेशवाई दप्तरांतील कागदपत्र छापण्यास अद्याप प्रारंभ व्हावयाचा आहे व तें काम 'बारभाई' चे हाती पडल्या - कारणानें, वास्तविक श्रम करणार व खर्च करणार यांची उत्सुकता असूनहि ते छापण्यास लवकर सुरवात होईल का नाहीं, व सुरवात झाली तरी काम निर्विघ्नपणे पार पडेल का नाहीं याजबद्दल आज कांहींच निर्वाळा देतां येत नाहीं. अशा स्थितीत केवळ आत्मावलंबनाचे जोरावर निघालेलें, आजपर्यंत एक सूत्राने चाललेलें, एकनिष्ठेनें पुढे चालविलें जाईल असे हृद आश्वासन देणारे व केवळ ऐतिहासिक कागदपत्रांचे प्रसिद्धीस वाहिलेले असें लहानसे पण सुंदर मासिकपुस्तक आजमितीस चालू आहे. हें मासिक- पुस्तक म्हणजे मिरज हायस्कूलचे संस्कृत शिक्षक, रा० वासुदेव वामन- 'शास्त्री खरे, यांनी चालविलेलें “ऐतिहासक लेखसंग्रह " हे होय.

-२-

प्रस्तुतचा विषय हाती घेण्यास कारण म्हटले म्हणजे रा० खरे यांचा प्रतिहासिक सुखसंग्रह होय. कोणताही अंक यहछ्येणे हाती घेऊन पाहिला असतां या मासिक पुस्तकाचें महत्त्व व त्यांची उपयुक्तता किती आहे याची सहज कल्पना करितां येते. परंतु अशा प्रकारच्या मासिक- पुस्तकाचें साहित्य आर्धी मिळविण्यास व नंतर तें प्रसिद्ध करण्याचे