पान:इतिहास-विहार.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केळकराचे लेख

घेतली. न्यू स्कूलवाल्यांच्या हातीं ही जागा जाती तर शनिवारवाड्यांतील सर्व पटांगण हल्लींहून अधिक साफसुफत राहिलें असतें. कारण तेथें मुलांचें खेळण्याचे मैदान बनले असतें. कोर्टाकडे जागा गेल्यानें तितकीहि साफ- सुफी राहिली नाहीं. कारण बागबगीचावर खर्च रिकामा कोण करतो ? अलीकडे शनिवारवाड्याच्या उपयोगाची तिसरी एक कल्पना निघाली होती. लॉर्ड रे साहेबांच्या नांवानें पदार्थसंग्रहालय करण्यासाठी सरकारचे व म्युनिसिपालिटीचे मिळून सुमारें ४० हजार रुपये शिल्लक आहेत. ते खर्चून रसाहेबांचें स्मारक येथें करावें असाहि विचार चालू होता. हें घडून येतें तर भलत्या ठिकाणी भलतीच गोष्ट होऊन शिवाय बागेवर निराळा ख़र्च करावा. लागला असता. पण ही कल्पनाहि रहित होऊन या जागेवर एक इटालियन पद्धतीचा नुसता बगीचा करावा अशी योजना पुढे आली. काही वर्षांपूर्वी लॉर्ड कर्झन यांनी प्राचीन वस्तुरक्षणाच्या प्रेमानें फुटकळ खर्चाच्या पुष्कळ गोष्टी करविल्या, त्यांपैकीं शनिवारवाड्याच्या वांढ्याला फक्त एक शिलालेख आला. आंतील जीणोद्वार तसाच राहिला. परंतु, भांबुर्डे व पुणे शहर यांच्या दरम्यान नदीवर पूल, पलीकडे नवें रेल्वे- स्टेशन व नवें गांवठाण वगैरे बांधण्याची कल्पना निघाल्यापासून, व विशे- पतः शनिवारवाड्यालगतच हा पूल बांधावयाचा ठरल्यापासून त्या वाड्याचे काय करावें, अर्थात् समोर होणाऱ्या सुधारणांचा फायदा घेऊन खुद्द वाड्याचा जीर्णोद्धार कसा करावा, या विचाराकडे सरकारी इंजिनियरांचे लक्ष अधिक वेधलें. इतक्यांत प्राचीनवस्तुसंशोधक व संरक्षक खात्याची दृष्टि. इकडे गेली, व गव्हर्नर सर जॉर्ज लॉइड यांच्याहि मनांत शनिवारवाड्या- च्या जीर्णोद्धाराची प्रेरणां झाली. यामुळे इतर सर्व विचार बाजूस राहून, वाड्याच्या मैदानांत पसरलेल्या मातीच्या टेकड्या उकराव्या व त्याखाली गुदमरून गेलेले ऐतिहासिक शिल्पवैभव मोकळे करून दर्शनाकरितां सुर- क्षित ठेवावे हीच मार्मिक विचारसरणी: प्रभावी होऊन खर्चास मंजुरीहि मिळाली. गव्हर्नरसाहेब झाले तरी त्यांनाहि खर्चाच्या काम इतरांचा प्रतिबंध होऊ शकतो. पण सर जॉर्ज लॉइड यांनी या कामी नेट धरला 'शिवाय लॉर्ड चेम्सफर्ड यांनाहि एक वेळ अभावितपणे आणून वाडा दाखवून त्यांचीहि सहानुभूति त्यांनी या कामी मिळविली असे म्हणतात.