पान:इतिहास-विहार.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण

८३

इतिहासलेखनाचा होता, परंतु जुने कागदपत्र किंवा बखरी तपासून प्रसिद्ध: करण्याचा नव्हता असें दिसतें, रा०व० कीर्तने यांच्या टीकेनंतर व कै विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे इतिहासावरील निबंधाचे दरम्यान "विविन ज्ञानविस्तारा "चेअंकांतून जुने कागदपत्र प्रसिद्ध होण्यास प्रथम सुरवात झाली. परंतु " विस्तारा "कडून होणारे काम फारच थोडे व काला- बंधीनें होत असे. यानंतरचा दुसरा प्रयत्न कै० शास्त्रीबुवा, रा०रा० कां० ना० साने यांचे हातून झाला. विविधज्ञानविस्तारानें नियमित रीतीनें बखरी व कागदपत्राचे प्रसिद्धीकरितां प्रत्येक अंकांची विवक्षित मानें देवाचें नाकबूल केल्यामुळे "काव्येतिहाससंग्रह " निघाला. या मासिक पुस्तकाचे द्वारानें तोंपर्यंत जमलेल्या बहुतेक बखरी वगैरेंची झडती झाली. व कांहीं अंशाने बखरींची व लेखांची कमतरता व कांहीं अंश प्रका 'शकांचा शीण किंवा कंटाळा यांच्या योगानें काव्येतिहाससंग्रह बंद पडला. 'यानंतर 'भारतवर्ष' निषेपर्यंत ऐतिहासिक लेख प्रसिद्ध करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर असा कोणी केला नाहीं. मध्यंतरी ऐतिहासिक असें वा बरेच प्रसिद्ध झाले; परंतु ते तुटक लेख, लहानमोठी चरित्र व • क्वचित् ऐतिहासिक विषयावर लिहिलेली नाटके व कादंबऱ्या अशा स्वरूपाचे होते. मात्र या मध्यंतरीच्या उद्योगांत निरनिराळ्या रीतीनें जुन्या कागदपत्रांचा थोडाबहुत शोध लागला व एकंदरीनें इतिहासद्राभ्य शौघण्याकडे प्रवृत्ति अधिक प्रचलित झाली; हैं खरें, रा०पारसनीस यांचे उद्योगानें, 'सातारकरमहाराजांचे दसर व कर्नाटकांतील दप्तर, तंजावर येथील कागद, त्याप्रमाणे झांशी, दतिया व आणखी कांही उत्तरहिंदुस्थानांतील कांहीं संस्थानांचीं दसरें यांजविषयीं शोध लागून शिवाजीमहाराज, व्यंकोजी, ब्रह्मेद्रस्वामी व उत्तर हिंदुस्थानांतील मराठे सरदार यांजविषयीं बरीच नवी माहिती मिळाली. रा० वासुदेवशास्त्री खरे यांचे नाना फडणविसांचे चरित्राचे अनुषंगाने मेणवलीचें फडणिशी दप्तर व पटवर्धनी दसर हीं चाळवें काम निघून त्यामुळे पेशवाईचे मध्यकालासंबंधानें पुष्कळ माहिती उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे बडोद्यास प्रभुरत्नमालाकारांनी चिटणिशी बखरी व कागदपत्र बरेच जमा केले. वि.का.राजवाडे - भाषांतर मासिक पुस्तकात्रे संपादक-यांनी पानपतच्या युद्धासंबंधाने अनेक पत्रे जमविलीं- (हीं-पत्रे