पान:इतिहास-विहार.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२
केळकरांचे लेख

सारखे सरदार खरोखर कितपत कारणीभूत झाले ? साडेतिन्हीपैकीं सबंध एक शहाणा गणलेला सखारामबापू यास शहाणा किंवा नुसता कपटी या दोहोंपैकी कोणचे विशेषण वास्तविकपणें देणें योग्य होईल ? त्याचप्रमाणें स्वामिभक्त मुसही म्हणून साधारणतः प्रसिद्ध असलेले सखारामबापूव महादजी शिंदे यांचा स्वामिकार्यापेक्षां स्वकार्यसाधनाकडे कितपत अधिक ओढा होता, .व ते मराठ्यांचे राज्यांत कलहं माजवून राज्य घालविण्यास कितपत कारणी- भूत झाले ? पुणे शहर जाळण्याचा अपवाद ज्यांच्यावर आला आहे. ते गोपाळराव पटवर्धन खरोखरच त्या अपवादास पात्र आहेत किंवा काय ? . या व अशाच आणखी कित्येक ऐतिहासिक महत्त्वाच्या वादग्रस्त गोष्टीं: संबंधानें १०।२० वर्षापूर्वी असलेली, व अलीकडे नवीन ऐतिहासिक माहिती उघडकीस आल्यानंतर बनलेली मतें, यांमध्यें अत्यंत फरक पडला आहे ही गोष्ट मनांत आणली असतां, कच्च्या माहितीवरून बनविलेले सिद्धान्त किती हानिकारक आहेत हैं सहज कळण्यासारखे आहे. तात्पर्य, इतिहासो- द्वाराचे जे दोन मार्ग वर सांगितले त्यांपैकी ऐतिहासिक माहिती मिळवून. " ती प्रसिद्ध करण्याचा मार्ग इतिहासाचे प्राथमिक स्थितीत तरी निदान अधिक श्रेयस्कर आहे.

 कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे पूर्वी जे प्रयत्न झाले ते फार अल्प होते असे दिसते, इ. स. १८६७ सालीं के० रा० ब० नीळकंठ जनार्दन कीर्तने यांनी पुणे कॉलेजचे विद्यार्थी असतां " ग्रांटडफकृत मराठ्यांच्या बखरीवर टीका " या नांवाचा एक लहानसा पण मार्मिक निबंध लिहिला आहे. त्यामध्ये निबंधमालाकारांप्रमाणेच रडकथा गाण्याचे निबंधकाराचे नशिबी आलेले आहे. निबंधाचे. सालापूर्वी मराठ्यांच्या इतिहासाचे पुनक जीवनाविषयीं जे कांहीं प्रयत्न झाले असतील त्यांचा उल्लेख रा० ब० कीर्तने यांचे टीकेत समर्पक रीतीने आलाच असता असे समजण्यास हरकत नाहीं. परंतु या टीकेत फक्त कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्याशिवाय इतर कोणाचाही उल्लेख केलेला आढळत नाहीं. यावरून बाळशास्त्रीबोवांखेरीज इतर कोणीच या बाबतींत प्रयत्न केला नसेल असें मानणे प्राप्त होते. बाळशास्त्री जांभेकरासंबंधानें सुद्धां "यांनी आपले लौकिकांस शोभेल असें थोडेबहुत लिहिलें आहे. " असा उल्लेख आहे यावरून त्यांचा प्रयत्न