पान:इतिहास-विहार.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण

८१

कल्पनाशक्ति व सर्वोहून श्रेष्ठ अस कट्टा स्वदेशाभिमान, इतक्या गोष्टी अंग आहेत, परंतु माहितीरूपी सामुग्री हवीतशी सिद्ध नाहीं, तर त्या माणसांच्या हातून इतिहास कसा तयार होईल ? इतिहास ही कल्पनेनें बनविण्याची गोष्ट नाहीं, एवढ्यामुळेच सर्व नडतें ! अपूर्ण माहितीनें जो इतिहास लिहिला गेला त्याचा पाया बळकट नसल्यानें तो पुढेमागें ढांसळून पडणार एवढेच नव्हे तर, घाईनें इतिहास लिहिल्याच्या योगानें इतिहासलेखनाचे खुद्द हेतूलाच मोठा धक्का बसतो ही गोष्ट विसरता कामा नये. जगामध्ये सत्य व असत्य यांचा नेहमीं पाठ- शिवणींचा खेळ चाललेला असतो व सत्यापेक्षां असत्याचीच चपळाई जास्त असते, म्हणून असल्यास एकदां 'आटपाटी'ची टाळी मिळाली, व त्यानें आघाडी मारली कीं, सत्यास मागें धांवतां धांवतां पुरेवाट होऊन जाते व पुष्कळ वेळीं सत्यास असत्य गांठतां न आल्यामुळे असत्यच शेवटी विजयी होऊन बसतें ही जगाच्या अनुभवाची गोष्ट आहे, अपूर्ण माहितीवरून इतिहास लिहिण्याचा प्रयत्न झाला असतां, ऐतिहासिक पुरुष व प्रसंग यांसंबंधाने खोटेच सिद्धान्त प्रचलित होण्याचा च ते एकदां प्रचलित झाले म्हणजे मांगाहून येणारे लोक व इतिहासकार यांची दृष्टि दूषित होऊन इतिहासंशोधन किंवा परीक्षण या कामाची सर्व दिशाची दिशाच चुकण्याचा संभव असतो. श्री नारायणरावसाहेब पेशवे यांचे बघांत आनंदी बाईचा खरा हात कितपत होता, व आजकाल लोकांत जिच्यासंबंधानें जितकी कुकीर्ति माजली आहे तितकी ती खरोखरच लोभी, दुष्ट व पापिणी होती किंवा काय ? प्रसिद्ध मुत्सद्दी नानाफडणवीस यांजवर स्वामिणी-जारत्वाचा जो भयंकर आरोप दंतकथेनें लाद्रला गेला आहे व ज्याचा अनुवाद अँटडफसाहेबांच्या इतिहासांतहि केलेला आढळतो, तो -साधार आहे किंवा निराधार आहे १. श्री शिवाजी महाराज व थोरले बाज़ीरावसाहेब पेशवे यांच्या हातून, जी एवढी प्रचंड देशकार्ये घडून आली तीं, त्यांच्या आंगच्या स्वदेशाभिमानानेंच घडून आली किंवा त्यांस श्रीसमर्थ रामदासस्वामी व धावडशीकर ब्रह्मद्रस्वामी यांच्या स्वधर्मोपदशाचे स्फुरण मिळाले यामुळे ती सिद्ध करण्यास ते समर्थ झाले. १ पानिपतच्या लढाईत मराठ्यांस जे अपयश आलें, त्यास मल्हारराव होळकरा-