पान:इतिहास-विहार.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
केळकरांचे लेख

करावयास पाहिजे तितका सर्व आम्ही केला आहे, असे कधींहि म्हणतां यावयाचें नाहीं. पूर्वी वाडवडिलांविषय आमच्या लोकांचे मनांत तिरस्कार भाजला होता, तो जाऊन त्या ठिकाणीं योग्य असा आदर उत्पन्न झाला आहे; व पूर्वीची इतिहासाची अनास्था जाऊन त्या ठिकाणी एक प्रकारची उत्सुकता आली आहे हे खरें. परंतु ती उत्सुकता तृप्त करून तो आदरभाव सप्रमाण व चिरंतन करून ठेवण्यास ज्या साधनांचा उपयोग करून घ्यावयास पाहिजे त्यांचा उपयोग अजूनपर्यंत आम्हीं करावा तितका केला नाहीं. तथापि 'अकरणात् मन्दकरणं श्रेयः' या न्यायानें इतिहासो- द्वाराचे काम झाल्या तेवढ्या उद्योगाबद्दल आनंद मानण्यास कांहीं हरकत नाहीं. काळाच्या प्रत्येक घटकेबरोबर आम्ही व आमचे वाडवडील यांमधील अंतर वाढत चालले आहे व विद्यमान असलेल्या इतिहास- साधनांचा क्षणोक्षणीं विध्वंस होत आहे हें खरें, तरी अशा कार्मी अनुकूल मनःप्रवृत्ति उत्पन्न होणे हीच मुख्य गोष्ट असते व ती आज सुशिक्षित लोकांत उत्पन्न झालेली असल्यामुळे आमच्या इतिहासाच्या उद्धाराचें काम पुढेमागे खचित पार पडणार अशी सदाशा उत्पन्न होणे साहजिक होय.. इतिहासाच्या उद्धाराचें काम दोन मार्गानी होणारे आहे. एक जुने कागदपत्र शोधून काढून व जुन्या दंतकथा वगैरे मिळवून त्या छापवून काढणें हा; व दुसरा, अशा रीतींनी उपलब्ध व प्रसिद्ध झालेल्या माहिती- बरून संशुद्धि, अन्वय, विरोधदर्शन, एकवाक्यता व अनुमान इत्यादि ठरीव रीतींच्या साहाय्यानें, सुसंबद्ध असा इतिहास तयार करणे हा होय. वास्तविक या दोन मार्गोपैकी पहिला हा अधिक महत्त्वाचा आहे, एवढेच नव्हे, तर त्याजवरच दुसऱ्याचा सर्व जीव अवलंबून आहे हे उघड आहे. पहिल्या मार्गाने इतिहासाचें द्रव्य तयार होतें, व दुसऱ्या मार्गाने त्या द्रव्यापासून सुंदर आकृति तयार करितां येते. उत्तम शाडू तयार असेलं तर साधारण मनुष्यसुद्धां गणपतीच्या आकारासारखी, चालचलाऊ काम भाग- विण्यापुरती मूर्ति तयार करूं शकेल. परंतु मुळीं शाडूच न मिळेल तर अत्यंत कल्पक व गुणवान् मूर्तिकार व त्याजपाशीं उत्तम प्रकारचे सुंदर रंग अशी सामुग्री सिद्ध असूनहि ती अगदी व्यर्थ हीच गोष्ट इतिहासाची. असो. जाडी विद्वत्ता, तीक्ष्ण बुद्धि, खोल शोधकपणा, विकसित मन, अगान