पान:इतिहास-विहार.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचे परीक्षण

७९

लागतें. असो; तरी पण कांहींहि असले तरी २०/२५ वर्षांपूर्वी आपल्या इतिहासाबद्दल आपणांमध्ये अत्यंत खेदजनक अनास्था होती ही गोष्ट अगदर्दी निर्विवाद आहे, दुसरी एक गोष्ट अशी आहे की, हल्लींपेक्षा त्या काळीं मिशनरी वगैरे हितशत्रूंचा सुळसुळाट फार झालेला असून अनुपलब्ध इति हासाचा शोध राहोच, परंतु उपलब्ध असलेल्या इतिहासासंबंधानेंहि अत्यंत खोडसाळ व विपरीत असे. कुतर्क प्रचलित झाले होते. अशा रीतीने एक- पक्ष आमची स्वतःची अनास्था व दुसरे पक्षी आमच्या विधमा हितशत्रूंचा दुष्ट उद्योग या दोन कारणांमुळे आपल्या इतिहासाची दुर्दशा व नायनाट होऊन जाण्याचा रंग आला होता. अशा स्थितीत स्वाभिमान पूर्ण अशा कोणत्याहि मनुष्याला वाईट वाटणे स्वाभाविक आहे. या दृष्टीने पाहिले असतां, शास्त्रीबोवांचे लेखांमध्ये भाषेचा जो एक प्रकारचन कडकपणा दृष्टोत्पत्तीस येतो, तो योग्य किंवा निदाम क्षम्य आहे असे कोणासहि कबूल करणें भाग आहे. परंतु शास्त्रीबोवाच्या निबंधाविषय 'कौतुक' वाटतें, असे जे आम्ही वर लिहिले आहे ते केवळ त्या निबंधांची सणसणीत भाषा किंवा त्यामधून चमेकणारा लेखकाचा स्वदेशाभिमान या गोष्टींमुळे वाटते असे नाहीं, तर त्या लेखानंतर व बहुघा त्या लेखांमुळे थोडक्याच काळात जिकडे तिकडे मराठ्यांच्या इतिहासाचे परिशीलन व शोध यांचा जारीने उपक्रम कसा झाला, व शास्त्रीबावानी कठोरपणाने परंतु सद्धेतूने घातलेल्या अंजनाने आमच्या सुशिक्षित लोकांचे डोळे उघडून त्या द्वारे हृदयांत स्वाभिमानाचा प्रकाश कसा पडला, हे पाहून कौतुक वाटते. मात्र आपण घालून दिलेले वळण व आपला उपदेश यांजमुळे मराठ्यांचे इतिहासाचे बाबतीत १०।२० वर्षात केवढे स्थित्यंतर झाले "याची प्रचीति पहाण्यास शास्त्रीबोवांस निर्दय काळाने जिवल ठेविले नाही ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. असो.

 मराठ्यांचे इतिहासाच्या उद्धाराचे बाबतीत शाखाका आजचा काल यांमध्ये फरक पडला आहे व हल्लींची स्थिति त्या मानाने सुधारली आहे असे वर सांगितले आहे. पण वास्तविक ही सुधारणा केवळ सापेक्ष होय.पूर्वीपेक्षा इल्ली इतिहासाचे अगल्य अधिक दिसून येते हे 'खरें, तरी पण आमच्या इतिहास शोधनाचे काम जिसका उद्योग आम्ही
के...६