पान:इतिहास-विहार.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांचे ऐतिहासिक पोवाडे

७७

बाळपणापासून व्हावी अशा इच्छेनें भि० ऑक्वर्थ यांनीं शाळिग्राम यांच्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत अशी सूचना केली होती की, * मराठी शाळांतून व इंग्रजी शाळांच्या मराठी अभ्यासक्रमांतून पोवाड्यांचे थोडेसे शिक्षण द्यावें. या सूचनेनंतर प्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमाचीं पुस्तकें ठरविण्याकरितां एक स्पेशल कमिटीहि नेमली गेली होती. परंतु ऑक्वर्थसाहेबांच्या सूचनेचा विचार झाला नाहीं.उघडच आहे, तो कसा होणार? जेथें सगुण देवांची नांवें एकतर्फी व विशिष्टघमय म्हणून आहेत तशी राहू देण्यास विचार पडतो, व शिवाजीच्या गोष्टी राहू दिल्याच तर मोठ्या कष्टानें राहू दिल्या जातात, तेथें मुलांच्या पुस्तकां- त पोवाडे घालून त्यांचें शिक्षण देण्याचे भयंकर घातक कृत्य करण्यास कोण धजणार? पण हें असें आहे म्हणूनच, शाळिग्राम यांच्या पोवाड्यां- च्या संग्रहाची तिसरी आवृत्ति निघते, व मे० किंकेडसाहेबांसारखे इति- हासप्रिय सद्गृहस्थ त्यास प्रस्तावना लिहून जगापुढे आणतात, या गोष्टीचा आम्हांस आनंद वाटतो.