पान:इतिहास-विहार.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ऐतिहासिक लेखसंग्रहाचें परीक्षण

"वाडवडिलांची कीर्ति वाढविणें आपल्या हातून होत नाहीं, तर तिचें रक्षण करून ती बुद्धं न देणें हें तरी श्रेय आपण घ्यावें... माहिती कितीहि क्षुल्लक वाटली तरी तिचा नीट संग्रह करून ठेवावा, का की, कधीं कर्धी एखाद्या अशा क्षुल्लक गोष्टींतहि असे तात्पर्य असेल की तिच्या योगानें कुदाचित् इतिहास फिरू शकेल. " -- (निबंधमाला.)

 मराठ्यांच्या इतिहासाचे पुनरुजीवन व्हावें या इष्ट गोष्टीविषयीं जीं कांहीं साधक कारणें दाखवितां येण्यासारखी आहेत त्या सर्वांचें सार वरील अव- तरणाच्या दोन लहानशा पण चटकदार वाक्यांत उतरलें आहे असे आम्हांस वाटते. कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या हृदयांत, स्वदेश व वाडवडील यांविषयींचा निस्सीम अभिमान अभिस्फुलिंगाप्रमाणे सदैव जागृत असून त्यांच्या स्वभावांच्या आवेशाला तेथूनच स्फूर्ति मिळाली होती; आणि त्यांच्या संस्था व त्यांचे लेख यांजमध्ये त्याच तेजाचा क्षणभर दिपवून सोडणारा असा लखलखाट पडला होता. वरील अवतरणांतील वाक्यरत्ने ज्यांमध्ये प्रथित झालेलीं आहेत तो " इतिहास " या विषयावरील शास्त्रीबोवांचा मनोवेधक निबंध आजच्या स्थितीत वाचण्यांत आला असतां वाचणारास एक प्रकारचे कौतुक वाटतें. निबंधाचे वेळची मराठ्यांच्या इतिहासाची स्थिति व त्याचीच आजची स्थिति यांमध्यें एक प्रकारचें समाधानकारक अंतर पडलेले, आहे हैं कोणाहि विचारी मनुष्यास स्पष्टपणे दिसून येईल. शास्त्रीबोवांच्या वेळी मराठ्यांच्या इतिहासाविषयीं कोणास फारशी आस्था उत्पन्न झालेली नव्हती, येवढेच नव्हे, तर त्या इतिहासाविषय पुरें अज्ञान किंबहुना एक प्रकारचा तिरस्कारहि माजला होता. आमच्या इतिहासाची साधनें आजच्या- पेक्षां त्या काळीं असली तर अधिकच विद्यमान व उपलब्ध असायचीं हैं। निर्विवाद आहे; असें असतां हल्ली इतिहासाचे उद्धाराविषयीं सर्वत्र जी कळकळ दिसून येते तिच्या दशांशहि त्या वेळी असूं नये हा त्या काळच्या लोकांच्या मनांत असलेल्या स्वाभिमानाभावाचाच प्रताप होय असे म्हणावें


• तारीख २८ जून १८९८