पान:इतिहास-विहार.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
केळकरांचे लेख

खेळवूं लाविण्याचें जें पोवाढ्यांतील सामर्थ्य तें यांच्यांत कसे येणार १ नव्या कालमानाप्रमाणें कांहीं नव्या अशा गोष्टी आम्हांस मिळत आहेत. पण “जुन्या कित्येक गोष्टींची जागा कोणत्याहि नव्या गोष्टींनीं भरून निघणें शक्य नाहीं; व ऐतिहासिक पोवाडे ही त्यांपैकींच एक गोष्ट होय !

 खुद्द ऑक्वर्थसाहेबांनीच असे उद्गार काढले आहेत कीं, "मराठ्यांच स्वराज्य गेलें, परक्यांचे राज्य त्या जागी आलें, व शांतता चांगली खरी, पण तिच्यामुळे सर्व राष्ट्राच्या चरित्रांत एकेरीपणा आला व वैचित्र्य नष्ट झाले. युद्धे हीं वाईट खरौं, पण त्यांच्या योगानें राष्ट्रीय चरित्रपटावर जी निरनिराळी चित्रे दिसावयाची आणि मनास ताजेपणा व उल्हास वाटा- क्याचा तें सर्व नाहींसें झालें, तात्पर्य, राष्ट्रांतील जातिवंत कवींना खरी काव्यस्फूर्ति होण्यास जी परिस्थिति लागते ती हल्लीं नाहींशी झाली आहे. मग नवीन पोवाडे कसे निर्माण व्हावेत ? आगगाडी पाहून क्षणभर मनास चमत्कार वाटतो खरा;पण विजेच्या दिव्यानें लखलखणारी व तासाला ६० मैल जाणारी पंजाब मेल डोळ्यांपुढून गेली तरी, स्वदेशी इतिहास बनत असतांना एखाद्या कोनाकोपन्यांत झालेल्या लहानशा चकमकी- इतकेहि तिच्या महाराष्ट्रीय कवीला स्फुरण येणार नाहीं. मग शिवाजी- महाराज व बाजीराव यांचा पराक्रम अगर नानाफडणवीस किंवा पाटील- बुवा यांचें राजनीतिचातुर्य यांची भर कशानें निधून येणार ! पोवाड्यांपेक्षां वाष्टीनें आधुनिक कवींची कविता अधिक चांगली असेल; पण पोवाडे सोडून या कवितेकडे आपण आलों म्हणजे, हिमालयावरील किंवा नर्मदाकांठच्या प्रचंड बनांतून निघून फळझाडांचें बीं विकणाऱ्या एखाद्या नर्सरीवाल्याच्या परसांतील बार्गेत, किंवा दिवाणखान्यांतील चिनी कुंड्यां तून खुरटविलेल्या तालतमालांच्या हातभर पानांच्या सावलीत आपण आलो आहो असे वाटतें, याला नाइलाज आहे! आधुनिक कलाकुसरीची कविता महाराष्ट्रांतील शेंकडा ९५ लोकांच्या कानींहि अद्यापि गेलेली नाहीं; उलट, पोवाडे गाण्याची पद्धति नष्टप्राय झाल्यामुळे पोवाडे जवळ जपळ लोपले तरी त्यांची तेजस्वी स्मृति अद्यापि त्यांच्या मनांतून नष्ट झालेली नाही. अशा वेळी पोवाड्यांना जितके उत्तेजन देता येईल तितकें थोडेच होणार आहे. " या तेजस्वी पोवाडयांची ओळख महाराष्ट्रीयांना