पान:इतिहास-विहार.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्याचे हेतिहासिक पोवाडे

७५

गोंधळी अर्ध-तमासगीर मंडळी तुणतुणी खेचून तिसऱ्या सप्तकांत सूर नेऊन गात व साथ करीत आहेत; कडकडीत डफावर डाव्या हाताची टिचकी व उजव्या हाताची थाप मारून त्यांचा पुढारी एकाहून एक सरस असे पोवाडे आठ-आठवून म्हणत आहे; आणि सर्व श्रोते मंडळी तल्लीन होऊन तटस्थ झाली आहे- अशा अस्सल देशी थाटांत पोवाडे ऐकण्या-- ची गोष्ट कांहीं वेगळीच आहे ! तिचें स्वारस्य ज्यानें अनुभविलें नसेल त्याला तें सांगून काय कळणार ?

 पोवाडे म्हणण्याची ही जुनी पद्धत जशी लोपली तसेच पोवाडे होण्याचे ' विषयहि महाराष्ट्राला तूर्त लोपले आहेत असेच म्हणणे भाग आहे.... अलीकडच्या काळी पोवाडा कशाचा होणार ? पेशवाई नष्ट झाल्यापासून युद्धाची रम्यकथा फक्त पुस्तकांत वाचावयाला मात्र शिल्लक उरली आहे. दरम्यानच्या काळांत एखाद्या मराठ्या सुभेदारानें साऊडनमध्यें शौर्य दाखवून, किंवा सरहद्दीवरच्या धामधुमीत डोंगर चढून उतरून, शाबासकी- चीफीत किंवा बहाद्दरीचा एखादा बिल्ला मिळविला असेल, पण ही लढाई कोणाकरितां ? तिची हुकमत कोणाकडे ? तिचे वर्णन ऐकावयास कोणास मिळणार ? व मिळाले तरी त्यानें पोवाडे रचण्यास लागण्यासारखा उत्साह ऐकणाऱ्यांच्या हृदयांत कसा उत्पन्न होणार ? बिनलष्करी पेशाच्या धंद्यांतहि धैर्य-वीर्य दाखविण्याचे प्रसंग येत असतील, नाहीं असें नाहीं. पण पोवाड़ा करणाराने आज पोवाडा करावा तरी कुणाचा १ कळकळीनें वस्तुपाठ शिकविणाऱ्या मास्तरांचा ? की 'गाऊन घालून तडतड इंग्रजी ब्रोलणाऱ्या प्रोफेसराचा? की टाकाच्या एका वळशाने कारवाईचे कारस्थान साधणाऱ्या शिरस्तेदारांचा १ की कौन्सिलांत तोंड पाटिलकी गाजविणाऱ्या नामदारांचा ? की धान्याचीं पोतीं विलायतेस पाठवून दलाली मिळत्रि- णाऱ्या राइलीच्या एजंटाचा ? ऑक्वर्थसाहेब आधुनिक पोवाड्यांचा शोध करीत असतां त्यांना ‘आगगाडी'वर रचलेला एक पोवाडा आढळला होता; आम्हीहि व्हिक्टोरिया महाराणीच्या चरित्रावर एका मद्दामहोपाध्याय–प्रायः पंडितानें- संस्कृतान्त लिहि एकू-सहाकाव्य पाहिलें ' आहे. पण असले पोवाडे व असली महाकाली यांची प्रसिद्धि छापखान्या- च्या कंप्राक्षिट्टरापलीकड़े फारशी होणे शक्य नाही, मग राष्ट्रीय वारें अंगांत