पान:इतिहास-विहार.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४
केळकरांचे लेख

हूडच्या पराक्रमाचेंच पोवाडे झाले आहेत; पण इंग्लंडला नेपोलियन- 'बरोबर दहा बारा वर्षे लढवून पांचपंचवीस लढाया अप्रत्यक्ष रीतीनें घडवून आणणान्या बालमुत्सद्दद्याचे म्हणजे राजकारस्थानी विलियम पिटचे-- पोवाडे कधी झाले नाहीत! महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पोवाड्याचीहि गोष्ट अशीच आहे. या पोवाड्यांचा ओघ पेशवाईच्या अखेरपर्यंत टिकला व तेथपासून तो मावळल्यासारखीच झाला म्हटले तरी चालेल. वास्तविक चारित्र्यार्ने उदात्त असणाऱ्या लोकांची महाराष्ट्रांतील परंपरा पेशवाई --बरोबरच मावळली हे मुळींच खरे नाही, परंतु महाराष्ट्रांत स्थापित झालेली शांतता, आधुनिक सुधारणेचा रसहीन प्रवाह व प्रभाव, विशेषतः स्वराज्याचा लोप या गोष्टी नवीन पोवाडे होण्यास प्रतिबंधक झाल्या आहेत. आधुनिक सुधारणेचे मूर्धाभिषिक्त उदाहरण म्हणजे आगगाडी. या आगगाडीपासून "इतर अनेक फायदे झाले असले तरी, तिने महाराष्ट्रीयांची बरीचशी रासकता कमी केली, निसर्गनिर्मित भूषणास्पद देखाव्यांपासून महाराष्ट्राची दृष्टि ओन घेऊन भलतीकडे लावली, व पोवाड्यांसारखी जनतेच्या अंतरंगातून निघणारी जनतेचें अंतरंग तल्लीन करून सोडणारी - राष्ट्रीय काव्ये निर्माण होण्याचा रसिकतेचा झरा आटवून सोडला, असें मि० आर्थ यांनी गाऱ्हाणें केलें आहे तें सर्वस्वी खरे आहे. कालाच्या कलाटणीमुळे, आम्हास पूर्वी कर्धी न मिळणारी अशी देशी व विदेशी सौख्य मिळू लागली आहेत हें खरें. तथापि पोवाडे करण्याचे, पोवाडे म्हणण्याचे व पोवाडे ऐकण्याचे आमचें सुख नष्ट झाले आहे यात शंका नाही. ऑक्वर्थ, शाळिग्राम, किंकेड वगैरे मंडळीच्या परिश्रमाने जुने पोवाडे छापले जाऊन ते विस्मृति- रूपी मृत्यूच्या दाढेतून तरी बाहेर पडले यांत बाद नाहीं. पण आराम- खुर्चीवर पडून, विजेच्या पंख्याचा वारा घेत व हवाना ं सिगारचे झुरक - सोडीत वाचलेल्या पोवाड्यांपेक्षां जुन्या पद्धतीने म्हटले जाणारे पोवाडे : ऐकून होणारे सुखं खरोखर किती तरी श्रेष्ठ ! रंगपंचमीच्या दिवशी सायं- काळी चावडीसमोर पिंपळाच्या पारावर फाटकी तुटकी बैठक घेतली आहे; बुदलीनें औतल्या जाणाऱ्या तेलाने पेटणार हिलाल पाजळत आहेत; रंगीबेरंगी कपडे घातलेले अर्थ उघडे लोक गोळा झाले आहेत; पायेति --तौडा, डोक्यावर कंगणीदार पगडी, व त्यात तुरा खोवलेला अशी अर्ध-