पान:इतिहास-विहार.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांचे ऐतिहासिक पोवाडे

७३

वर चढविण्यास कांहीं कमी केलें नसतें त्याच्या समकालीन पिढीला त्याची स्मृति उघडपणे करणे कठीण गेलें असतें व कित्येकांना तर तो कोणी मोठा मनुष्य आहे, असेंहि कदाचित् मनांतून वाटलें नसतें. पण. पुढील पिढ्यांना त्याच्या चारित्र्याचें खरें मर्म कळल्यामुळे त्यांना रॉबिन - च्या बेकायदेशीर वर्तनाचें कांहींच वाटलं नाहीं व त्यांनी त्याला उमदी. नायक बनवून त्यावर पोवाडे केले. इकडे इंग्रजी अमलांत झालेल्या उमाजी नाईक वगैरेंचीहि तीच गोष्ट आहे. तो दरोडेखोर तरं खराच, व अखेर फांशीहि गेला; पण त्याच्या दरोडेखोरांत शौर्य, धैर्य, प्रसंगावधान, औदार्य महत्त्वाकांक्षा, माणुसकी वगैरे अनेक उत्कृष्ट गुणांचे मिश्रण झालेलें अस- स्यानें, पीनल कोडाप्रमाणें शिक्षा झालेल्या या अलौकिक व्यक्तीचे पोवाडे- शाहिरांनी केले; ते गाणारे भिकारी अजूनहि या दरोडेखोराच्या नांवावर आपले पोट भरतात व सरकारालाहि त्या पोवाड्यांपासून दरोडे घालण्यास उत्तेजन मिळेल अशी फाजील भीति वाटत नसल्यानें, तें ते पोवाडे गाण्यास प्रतिबंध करीत नाहीं.

 तात्पर्य, मनुष्याचे पोवाडे होऊन लोकांनीं ते गाण्यास त्याच्या अंगी, . कांहीं लोकोत्तर गुण असावे लागतात. मग सुदेवानें तो शिवाजीमहां- राजांसारखा, अफजुलखानास मारण्याचे धाडस करणारा पूर्ण यशस्वी वीर असो; तानाजी मालुसऱ्यासारखा सिंहगड घेऊन प्राणास मुकलेला अर्ध- यशस्वी सरदार असो; सदाशिवरावभाऊसारखा पानपतची लढाई हरून स्वपक्षांची कीर्ति व स्वतःचे प्राण गमावणारा सर्वस्वी अपेशी असा सेना- नायक असो; अहिल्याबाईसारखी उदारचरित व पुण्यशील पापभीरू साध्वी असो; किंवा उमाजी नाइकांसारखा बेकायदा वागणारा व प्रसंग-- विशेष प्राणहानीकडे न पाहणारा मिश्र गुणविशिष्ट दरोडेखोर असो !

 पोवाड्यांचे उत्पत्तिकारण हे असें असल्यामुळे, कोणत्याहि समाजांत तत्कालीन वीरपुरुषांचे पोवाडे ताबडतोब होऊन गाण्यांत येणें अशक्य असते; आणि ज्यांच्या अंगीं वीररसाचे भाव व विभाव होऊ शकतील असे- . किंवा इतर लोकोत्तर गुण नसतात, ते इतर रीतींनी कितीहि चांगले असले तरी त्यांचे पोवाडे होऊन गाइलेले ऐकावयास मिळण्याची प्राय: केव्हांच आशा नको. इंग्लंडांत झाले तरी, 'चेव्ही चेस'च्या लढाईचे किंवा रॉबिन -