पान:इतिहास-विहार.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठ्यांचे ऐतिहासिक पोवाडे

७१

महाराष्ट्रीयास आनंद झाल्यावाचून राहणार नाहीं ! अशा काम युरोपियन लोकांकडून होणारे साहाय्य खरोखरच यस भूषणास्पदं आहे.राज्य- कारमारांच्या वेळी 'आम्ही तुम्हांस जिंकणारे' अशा अभिमानाचा मुख- बेटा चंढवून प्रजेस त्यांना कंदर दाखवावी लागत असली, तरी कारभाराची वेळ जाऊन तो उग्र मुखवटा बाजूस काढून ठेवल्यावर, प्रजाजनांच्या अंत- रंगात आपले अंतरंग मिळवून, त्यांच्या राष्ट्रीयत्वास पोषक अशा गोष्टी जाणूनबुजून व निर्मत्सरबुद्धीने करणाऱ्या परकीय अधिकाऱ्यांचा धन्यवाद् कोणीहि गाईल ! मराठ्यांचे पोवाडे गाणे म्हणजे इंग्रजांशी राजद्रोह करणे नव्हे, ही गोष्ट खुद्द ऑक्वर्थसाहेबांनी आपल्या विद्वत्वपूर्ण प्रस्तावनेत १८९० सीली लिहिली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात विचित्र अ व वादळ उठली आणि त्यांचा परिणाम मित्याची भीति दुणावण्यात झाला. पण रा० शाळिग्राम यांच्या पोवाड्यांच्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीस प्रस्तावना लिहून किंकेडसाहेबांनी से फिरून एकवार जगापुढे मांडून “ही भीति निराधार आहे; महाराष्ट्राच्या विभूतींचे पोवाडे गाण्यास-प्रजा- जनांनी आपल्या पूर्वजांचे गुण आनंदाने घेण्यास सरकार कधहि हेरकत करीत नसतें व करणार नाहीं, " असेच एकप्रकारे सिद्ध केले असे म्हणण्यास हरकत नाहीं.

 कोणत्याहि देशांतील पोवाड्यांत महानुभाव विभूतींची चरित्रे व राष्ट्रीय अभिमान जागृत करणारा उदात्त प्रसंग यांचेच वर्णन असतें. वीररस हो पोवाड्यांतील मुख्य रस कोठेंहि असणार; व त्याचप्रमाणे प्रस्तुतच्या- पोवाड्यांतहि तो आहे पण खुद्द ऑकवर्थसाहेबांनी नमूद केल्याप्रमाण एखाद्या बीराचा पोवाडा होण्यास तो यशस्वीच झालेला असला पाहिजे असे मात्र नाही. पानिपतास भाऊसाहेब पडले व मराठे लढाई हरले, व उलटपक्षी उदगीरची लढाई भाऊसाहेबांनी जिंकली किंवा त्यांनी दिल्लीच तख्त फोडले; असे तीन प्रसंग असता पानिपतच्याच लढाईचा पोवाडा झोला, व उदगीरच्या लढाईचा झाला नाही- निदान झाला असला तरी पानिपतच्या पोवाड्याइतका लोकप्रिय होऊन टिकला नाही-हैं, ऑक्वर्य- साहेबांनींच साक्ष दिल्याप्रमाणे, पोवाडे करणीच्या शाहीरांच्या आणि ते पोवाडे प्रेमाने गाणाऱ्या मराठे लोकांच्या प्रामाणिकपणाचेच लक्षण आहे!