पान:इतिहास-विहार.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
केळकरांचे लेख

अंगावर मी हजारों रुपयांचे जवाहीर घातलें आहें, हजारों रुपयांच्या किंमतीची रामाची मूर्ति आज माझ्या मिळकतीच्या यादीत आहे," असे ' म्हणणाऱ्या उपासकाची भक्ति ही भक्ति कसली ? तेंच " हजारों रुपयांच्या जवाहिराचे तेज एकवटले तरी, परमेश्वरा ! तुझ्या तेजाच्या एका किरणांशा- इतकी तरी शोभा त्याला येणार आहे काय ? पण हा त्या तेजाची कल्पना मनात आणण्याचा केवळ एक अल्प मानवी प्रयत्न आहे" असे म्हणणाऱ्या संगुण रूपाच्या उपासकाची भक्ति ही मात्र भक्ति खरी ! या दोघांच्याहि मूर्तीवर जवाहीर आहे खरे; पण एकाची सर्व दृष्टि आपल्या बडेजावीची, दुसऱ्याची दृष्टि पूज्याची पूजा करण्याची! हेंच त्यांतलें अंतर !

 आपल्या पूर्वजांचे पोवाडे गाण्यातहि इष्ट व निषिद्ध असे हे दोन प्रकार अहित. महाराष्ट्राच्या हल्लींच्या स्थितीत दोन्ही प्रकार संभवतात. मोडकळीस आलेल्या खानदानीच्या घराण्यांतील विद्यमान वंशजांच्या तोंडी निषिद्ध प्रकारचे पूर्वज - कीर्तिपाठ आढळून येतात. पण उच्च शिक्षणानें, प्रेमळ भावनेने आणि राष्ट्रीय प्रेरणेनें जेथें जेथें महाराष्ट्राच्या जुन्या पिढीची कीर्ति गाइलेली आढळते, तेथे तेथे मात्र ती इष्टच होय यात शंका नाहीं. मोठ्या राष्ट्रीय दृष्टीने पाहिले म्हणजे मग गोत्र, कुळ, जात हे सारे क्षुद्र भेद लय पावतात; व जेथें ब्राह्मणाचा अभिमान मराठा धरितो व मराठ्या गुण ब्राह्मण घेतो, तेथें राष्ट्रीय भावना खरीच उदित झाली असे समजून चालण्यास हरकत नाहीं. असल्याच भावनेने मराठ्यांचे ऐतिहासिक पोवाडे संग्रहित करून छापण्याचे काम १८७९ साली महाराष्ट्रांत रा० शंकरराव शाळिग्राम यांनी कै. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या प्रेरणेनें प्रथम कैले, सुंदर पुस्तकाची सुधारून वाढविलेली आवृत्ति रा० शाळिग्राम व मिठ ऑक्वर्थ, आय. सी. एस्. यांनी १८९१ मध्ये काढली, व याच ग्रंथाची तिसरी आवृत्ति हल्ली रा० शाळिग्राम यांनी मुंबई सरकारचे पोलिटिकल " सेक्रेटरी व मराठ्यांच्या इतिहासाचे चाहते व भोक्ते युरोपियन सिव्हिलियन मि. सी. ए. किंकेड यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केली आहे. आणि या गोष्टीवरून मराठ्यांचे राष्ट्रीय पोवाडे गाण्यांची महाराष्ट्राची इच्छा, ब ते उखंड गाऊं देऊन त्यांचें स्वारस्य सेंवून गौरव करण्याची विद्वान् युरोपियन अधिकाऱ्यांचीहि इच्छा कायमच नव्हे तर वाढती आहे हे पाहून कोणाह