पान:इतिहास-विहार.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिल्लीचा ऐतिहासिक चिपत्रट

६७

बरोबर न घेतां चार लोकांत मिसळेल तर तुम्हांआम्हांस ओळखिताहि येणार नाही. पण इतक्या सुसंस्कृत मनाच्या राजास व प्रजेस मुकुट- “धारणाविधीचा अगदर्दी जुनीट व फाटकांतुटका कित्ता गिरविल्याशिवाय समाधान वाटत नाही! देशी नाटकांतल्या इंद्रसभेतील सोगासारखा पोषाख आणि बुडकुलींतून पवित्र तेल चमच्याने घेऊन ठराविक रीतीने डोक्याखांद्यावर काढलेली स्वस्तिकें वगैरे गोष्टी एरवींच्या प्रसंगी पाहून कोणासहि कदाचित् हसूच येईल. पण त्याच गोष्टी राज्यारोहणाच्या प्रसंगी कैल्याने त्यांपासून गईन गांभीर्य उत्पन्न होऊं शकते. अशाच काहीशा मनोवृत्तीने दरबार भरविण्याचेहि समारम केले जातात; व म्हणून कलकत्ता मुंबईसारखी प्रचंड व धनाढ्य राजधानीची शहरे सोडून दिल्ली- सारख्या मागसलेल्या व एका बाजूच्या शहरी मुद्दाम जोऊन दरबार भर- विण्यात येतात हे अगदर्दी उघड आहे, व या दृष्टीने पाहता ते योग्यहि वास्तविक इंग्रजांसारख्या दर्यावर्दी व समुद्रावर स्वामित्वं गाजे- विणाऱ्या व्यापारी योद्धयस मुंबई किंवा कलकत्ता हींच शहर दरबार मर- विण्यास योग्य दिसावी. तथापि दिल्ली शहर हे जुन्या ऐतिहासिक उपाधी नी बेष्टिलेले असल्यामुळे, हिंदुस्थानातील इंग्रज राजाचा दरबार इंग्रजानी स्वतः वसविलेल्या व अभिमानास्पद अशा कलकत्ता व मुंबई शहरी न भरवितां, जेथें पूर्वीच्या हिंदुमुसलमान राजांच्या मोडक्यातोडक्या किंवा रिकाम्या इमारती व अद्यापि गाडले गेलें नसल्यास त्या इमारतींतून -संचारणारें दिल्लीच्या रुधिरप्रिय वास्तुदेवतेचें भूत- याशिवाय जुन्या ऐति- हासिक साम्राज्याची आठवण करून देणारे किंवा सांधा जोडणारें दुसरें कांहीं एक अवशिष्ट नाहीं, अशा ठिकाणीं दरबार भरविल्याशिवाय इंग्रज राज्यकर्त्यांचे समाधान होऊं नये, यांतहि कोहीं आश्चर्य नाहीं. विसाव्या शतकां- तील सुधारणा देखील, इंग्रजांसारख्या केवळ व्यवहारदक्ष अशा लोकांच्याहि मनांतील राजकीय भावनेवर किंवा श्रद्धाळूपणावर, हरताळाचा बोळा फिरवूं शकत नाहीं. दिल्लीस दरबार भरविणें हें मेलेल्या हिंदुमुसलमान सम्राटांच्या कांवर टिचण्यासारखे उन्मत्तमणाचें कृत्य नसलें तरी, ज्या स्थळीं पूर्वीचे ऐश्वर्यसंपन्न सम्राट् होऊन गेले त्या वास्तूवरच दरबार भरविण्यांत विशेष औचित्य आहे, असे मानणें हें भोळेपणाचें किंवा श्रद्धाळूपणाचें लक्षण