पान:इतिहास-विहार.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८
केळकरांचे लेख

होय यांत शंका नाहीं पण इंग्रज हे सुधारलेले असले तरी जोपर्यंत त्यांनी मनुष्यस्वभाव सोडला नाही तोपर्यंत, दिल्लीस दरबार भरविल्यानें हिंदी प्रजेच्या मनावर साम्राज्याची विशेष छाप बसेल, असें प्रामाणिकपणानें मानण्याइतका भोळेपणा त्यांचे अंग मधून मधून चमकल्यास त्यांत आश्चर्य वाटण्यासारखेंहि कांहीं नाहीं. आतां दिल्लीस दरबार भरविण्याचें औचित्य पहावयाचेंच झालें तर तें एका दृष्टीनें दिसेल. म्हणजे सर विल्यम लीवॉर्नर यांनी नुक्तच एके ठिकाणीं लिहिल्याप्रमाणे इंग्रज सरकारच्या राज्यांत मिळालेल्या शांततेचे खरें चीज, घातपात व रक्तस्राव यांचेंच 1. निरंतर साहचर्य असणाऱ्या दिल्लीसारख्या शहराचे उदाहरण लक्षांत घेतलें असतांच होणार आहे. सन १८०३ सालापासून - ५७ सालची धामधूम अपवाद म्हणून सोडून दिली तर दिल्ली शहरांत नांदणारी स्वस्थता, व -तोपर्यंत पूर्वीच्या काळी त्या शहरांत माजलेली अस्वस्थता, या दोहोंमध्ये जितका विरोध आहे तितका दुसऱ्या कोणत्याहि दोन गोष्टींमध्यें सांपडणार नाहीं. : आतां सर विल्यम लीवॉर्नर भासवितात त्याप्रमाणे वरील विरोधः स्पष्ट करून दाखविणें हाच कांहीं दिल्लीस दरबार भरविण्याचा खरा हेतु नाहीं हें निर्विवाद होय. तथापि, दिल्लीचें पूर्ववृत्त लक्षांत घेता लीवॉर्नरसाहेबांचा हा युक्तिवाद यथार्थ नसला तरी शोभण्यासारखा मात्र स्वचित आहे.