पान:इतिहास-विहार.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६
केळकरांचे लेख

राजपरंपरेच्या इतिहासानें दिल्ली शहरास लोकोत्तर राजकीय महत्त्व येत आहे - हिंदु व मुसलमान सम्राटांनी ज्या राजधानींत अनेक शतकें राज्य केलें त्या शहरास हल्लींहि निरंतर मुख्य राजधानीचा मान देणे शक्य आहे. किंवा नाहीं हा एक वादच आहे; हा वाद हल्ली 'पायोनिअर' पत्रानें: जोसनें लोकांपुढें आणिला आहे परंतु कायमच्या राजधानीसहि जो मान मिळत नाहीं तो दरबारचा मान दिल्लीस सिळण्याचे कारण उघडच असे - आहे की, पूर्वी या देशांत हिंदू व मुसलमान सम्राट ज्या स्थानावर होते.त्याच स्थानावर इंग्रज प्रभु आज आहेत, असे सर्व जगाच्या निदर्शनास : विशेष रीतीने यावें. आठवण हा मनाचा खेळ आहे; आणि जुन्याच्या जाणों नयें येईल तेव्हांच जुन्याची आठवण नाहींशी होते असा मनाचाः धर्म असल्यामुळे, जें कार्य कायद्याच्या दृष्टीने १८५८ सालीं तमसा नदीच्या कांठी असणाऱ्या पार्लमेंटच्या सभागृहांत घडून आलें, तेंच कार्य मानवी मनाच्या दृष्टीने घडवून आणण्यास दिल्लीस दरबार भरविणें हेंच योग्य आहे हें कोणीहि कबूल करील. दिल्ली शहराशी आपला संबंध कायमचा जोडण्या करितां इंग्रजांनीं तेथें अद्यापि प्रचंड इमारती बांधल्या नाहींत. किंबहुना इंग्रज हे केवळ काव्यमय, रम्य, पण पोकळ अशा गोष्टीचे भुकेलेले - नक्षुन, व्यवहारपटुत्व हाच त्यांचा मुख्य गुण आहे; यामुळे पुढेमागें ते.. 1. दिल्लीस अशा इमारती बांधतील किंवा नाहीं याचीहि शंकाच आहे. हिंदुस्थानांत पूर्वीचे राजे लोक राज्यारोहणाच्या प्रसंगीं आपापल्या ऐपती- प्रमाणे हिरेमोत्यांची ताटें उघळीत व रस्त्यांतून दोन्ही दोन्ही हातांनी. चलनी नाण्यांची हत्तीवरून खैरात करीत हा हौसेचा पण फाजील उधळे- पणाचा प्रकार इंग्रज राजे इंग्लडांत किंवा खुद्द दिल्लींतहि करीत नाहींत. परंतु अशा नीरस पण व्यवहारदक्ष इंग्रजांनाहि परंपरेचें दास्यत्व सर्वस्वीं झिडकारून अलिप्त राहतां येत नाहीं. खुद्द इंग्लडांतहि नव्या राजाचा - १९११ साली झालेला मुकुटधारण-समारंभ ज्या विधींनी व ज्या शब्दो- वारांनी करण्यांत आला, तेच विधि व तेच शब्दोचार सन ७९५ साल- च्या- म्हणजे सुमारें अकराशे वर्षापूर्वी झालेल्या राज्यारोहणाच्या वेळीं.उपयोगांत आणिलेले होते, असा दाखला निघतो ! एरवींच्या प्रसंगी इंग्रज : राजाचा पोषाखनेहराव इतका साधा असतो कीं, तो हलकारे ललकारे-