पान:इतिहास-विहार.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दिल्लीचा ऐतिहासिक चित्रपट

66

बोलावयाचे"त्या वेळी जे अनर्थ त्या राजघानीवर कोसळले ते ऐकून- हि अंगावर रोमांच उभे राहतात, इराणी लोकांनी सर्व शहर जाळून लुटून फस्त केले. प्रेतांचे ढींग व रक्तांचे पाट यांनी सर्व रस्ते भरून गेले, तीस हजारांहून जास्त माणसें प्राणांस मुकलीं !" शिवाय व्यक्तिविषयक महत्त्वाकांक्षेनें दिल्लीच्या एकंदर इतिहासांत किती राजवंशांची उलथा- पालथ झाली व त्या उलथापालथीच्या अनुषंगानें किती कत्तली झाल्या, याची गणती करणे कठिण आहे. राजकारणाने घडून येणारा असा कोण ताहि गुन्हा नसेल की जो दिल्लीस घडून आला नाहीं ! हल्लींच्या दिल्ली- च्या आसपास कर्मीत कमी उध्वस्त अशी सात जुनीं गांवठाणे दिसतात; आणि जेथें एकहि जिवंत मनुष्य दिसत नाहीं अशा ठिकाणी मोकळ्या ओसाड किंवा पडक्या इमारती व गवत उगवलेली आणि किड्यामुंग्यांनी घरें केलेलीं जोतीं, पाये वगैरे पहाणाराचें मन उदास झाल्याशिवाय रहात - नाहीं. त्यांतूनहि मृत मनुष्यांस पुरून त्यांच्या थडग्यांवर इमारती बांधण्या- ची मुसलमान लोकांची चाल असल्यामुळे हुमायुनाच्या कवरस्थानासारख्या - प्रचंड इमारती शिल्पकला या दृष्टीनें नेत्रांस जरी आल्हाद देतात, तरी मृत्यूची आठवण करून देऊन मनास उद्विम करितात, कलकत्त्यास जसें " सिटी ऑफ पॅलेसेस " ( प्रासादनगर ) म्हणतात तसेच दिल्लीस "सिटी ऑफ टुम्ज" ( स्मशाननगरी ) हें नांव आहे. कर्मधर्मसंयोगाने दिल्ली- इतके जयस्तंभहि दुसऱ्या कोठें एकत्र पहावयास मिळत नाहीत. म्हणून वर सांगितल्याप्रमाणें थडगीं, जयस्तंभ, मनोरे, कत्तली, राजे लोकांनी भोगलेले ऐश्वर्य व आपत्ति या सर्व गोष्टी 'दिल्ली' या नांवाचा उच्चार होतांच आठवून मनुष्याच्या मनांत कालवाकालव झाल्याशिवाय रहात नाहीं !

दरबार दिल्लीसच कां ?

 संसारांत मनुष्याचें आयुष्य नेहमींच्या सरासरीपेक्षा अधिक लांबले तर दुःख पाहिल्याशिवाय डोळे मिटणे त्याला दुरापास्तच असतें. तशीच कांहीं स्थिति जुन्या पुराण्या दिल्लीची झालेली आहे, असे म्हणण्यास हरकत नाहीं. अशा तऱ्हेचें हें शहर दरबारास इंग्रज सरकारानें तीन वेळां पसंत केले, याचे सकृद्दर्शनी कोणासह आश्चर्य वाटेल. पण एकतर जुन्या