पान:इतिहास-विहार.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
केळकरांचे लेख

होते. ययातिप्रमाणें जुना काळ हा नव्या कालापासून तारुण्य घेतो, व पुरू- प्रमाणें नवी पिढी आपल्या गत इतिहासापासून वार्धक्याचें ऐश्वर्य मिळविते. संशोधन हें कधींहि फुकट जात नाहीं, त्याच्या आधाराने बनविलेले सिद्धान्त पुढेमागे खोटे ठरोत; परंतु पुराव्याचें साधन या दृष्टीनें संशोधित द्रव्य नित्य आहे. शेवटी संशोधकांना एकच सूचना करावयाची ती हीं कीं, त्यांनी निर्विकार मनानें सत्यान्वेषणाचीच दृष्टि ठेवली पाहिजे व साधनें मिळवितांनाहि महत्त्वाचीं कोणती व टाकाऊ कोणती, दुर्मिळ कोणचीं व सुम कोणची याचा विवेक ठेवला पाहिजे. Archaelogy आणि Architecture किंवा Antiquity वः Art या जोड्या केवळ समानार्थक शब्दांच्या असे मानले जाऊं नये. कालाने होणारा नाश टाळणें हें जसें अवश्य तसेंच क्षुद्र गोष्टींचा नित्य नाश करीत राहणें हेंहि अवश्य आहे. मृतांनीच जर जगाची सर्व जागा अडविली तर जित्यांनी जावें कोठें ? "

शनिवारवाड्याचा जीर्णोद्धार
केसरी, ९ ऑगस्ट १९२१


रि कामटेकड्या गणिती लोकांनी केलेल्या गमतीच्या अनेक हिशेबांपैकी एक हिशेब असा आहे की, पृथ्वीच्या पाठीवर जितकीं माणसें जिवंत आहेत त्यांच्यापेक्षां मेलेल्यांचीच संख्या अधिक भरेल. त्याच प्रकारचा दुसरा एक हिशेब असा कीं, पृथ्वीच्या उघड्या पाठीवर आज जितकें वैभव जागतें आहे त्यापेक्षां तिच्या झांकल्या उदरांत निद्रित वैभव अधिक भरलेले आहे. हा हिशेब सगळ्या जगासंबंधानें खरा आहे कीं नाहीं हें ठरविण्याला अर्थात् सगळी पृथ्वी उकरून काढावी लागेल. परंतु निदान एखाद्या ठिकाणी जेथें हें उकराउकरीचें काम कांहीं सुगाव्याने बरेचसे केलें जातें तेथें तरी हें निद्रावश वैभव हटकून सांपड़तें यांत शंका नाहीं. हैं उकराउकरीचें काम म्हणजे एक प्रकारें उंदीरघुशीचेंच काम हो या दृष्टीने सरकारच्या प्राचीनवस्तुसंशोधक खात्याला विनोदानें उंदरां- घुशीं खातें असें नांव कोणीं दिल्यास - तें शोभण्यासारखे आहे. साध्या