पान:इतिहास-विहार.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इतिहास व इतिहास-संशोधन

३.

जुना दगड, त्यांची राजवस्त्रे म्हणजे कसरीने खाल्लेले जुनाट कागदपत्र ! त्यांच्याहि खजिन्यांत नाणी भरलेली असतात पण बाज़ारांत एकहि चालत नाहीं. मन संशयानें ग्रासल्यामुळे डोळ्याला नेहमीं Magnifying glass. लागून राहिलेला. आसपास अंधश्रद्धा व तर्कवितर्क यांचा गराडा. अशा शून्यराज्यांत राज्य करणाऱ्या या राजाची मुद्रा म्हणजे शिक्कामोर्तवहि आहे.' पण त्याच्या आज्ञापत्रानें बोटभर जमीनहि कुणाला दिली घेतली जात नाहीं आणि सैन्यदळच काय पण एखाद्या झाडाचें दळ म्हणजे पानहि तो हालवू शकत नाहीं. मार्क ट्रेनच्या Prince and Pauper या कथानकां- तील तोतया राजपुत्राला राजवाड्यांतल्या जड शिक्कामोर्तबाचा उपयोग दाम फोडून खाण्याला तरी झाला. आमच्या संशोधकाला मिळालेल्या शिक्क्यानें आज्ञापत्र चालत नाहीं व त्यानें तो वदामहि फोडणार नाहीं. हा सर्व विनोद झाला पण तो स्तुत्यर्थ आहे. अर्थात् जी त्यांची थट्टा म्हणून दिसते ती सर्व निःस्वार्थी व शुद्ध ज्ञानाभिलाषी इतिहाससंशोधकाची निर्भेळ स्तुतीच आहे. संशोधक हा एक कृमि आहे. पण तो भक्षक कृमि - नसून रक्षक कृमि आहे. संशोधक हे काळाचे शत्रू होत.काळ मोकळा सोडला तर तो क्षणशः व कणशः सर्वनाश करीत असतो.पण संशोधक हे काळाच्या चाळणीचीं भोकें शक्य तितकीं निरुंद करीत असतात. इतिहास - संशोधनानें राष्ट्रस्मृतीचा तंतू अखंड राहतो व स्मृतिपरंपरा ही आनंद उत्पन्न करणारी असून व्यवहारालाहि उपयोगी असते. संशोधन करून इतिहास रचण्याचा फायदा कित्येकांस समजत नाहीं. इतिहासाचा तरी उपयोग काय ? तो वाचून मनुष्य शहाणा होतो या म्हणण्यांत फारसा अर्थ नाहीं. Knowledge comes but Wisdom lingers ( ज्ञान धांवतें पण शहाणपण रांगतें) हीच म्हण खरी, इतिहासज्ञानानें खरोखरच मनुष्यः शहाणा होता तर (History repeats itself) इतिहासाची पुनरावृत्तित्व- होते ही म्हण पडली नसती. पुनरावृत्ति होते याचा अर्थ पूर्वी ज्या स्थितीत मनुष्य जसा वागला त्या स्थितीत तो तसाच फिरून वागणार मंग इतिहास वाचू 'व तरी काय करावयाचे १ एका अर्थाने हे खरे आहे. पण इतिहासाला व्यावहा- रिक (Applied) ज्ञान. न म्हणतां शुद्ध (Pure) ज्ञान म्हटले तरी त्याचें संशोधन- 3 अनिर्वायच ठरते. संशोधनाच्या परिसाने जुने व नवें - यांचे क्षणांत मधुर मीलन.